जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो/आंतरराष्ट्रीय महिला दिन >> ८ मार्च हा दिवस आपल्या बरोबरच संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन / आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो त्यामागचे नेमके कारण काय हे अजूनही आपल्या पैकी अनेकांना माहिती नसेल. आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचे कारण असे की, महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
दिंनाक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्युयॉर्क येथे पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निच्छित करण्यात आला. चला तर मग जाणून घेऊया हयाच जागतिक महिला दिनामागचा आपल्याला माहित नसलेला इतिहास.
जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो/आंतरराष्ट्रीय महिला दिन – इतिहास
संपूर्ण अमेरिका व युरोप सहित जवळ जवळ जगभराच्या स्रियांना एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता.
१८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन ची स्थापना झाली, परंतु ही असोसिएशनसुध्दा वर्णव्देषी व स्थालांतरितां विषयी पूर्वग्रह असणारी होती. साऊथ कडील देशांना कृष्णवर्णीय मतदात्यापासून तसेच उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतर्गत मतदारांपासून वाचवण्याकरता स्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या काळात होयला सुरवात झाली होती. या हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या व देशांतरित कामगार स्रियांनी जोरदार विरोध केला आणी क्रांतिकारी मार्क्सवादयांनी केलेल्या सार्वत्रीक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठींबा दिला.
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.या परिषदेत क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने आपले विचार प्रभावीपणे मांडून सार्वत्रित मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली.
८ मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोदयोगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस व कामाच्या जागी सुरक्षीतता हया मागण्या केल्या. या दोन मागण्याबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता व शैक्षणीक पार्श्वाभुमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरूषांना मतदानांचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.अमेरिकन कामगार स्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.
१९०९ साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसरया आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. या ठरावानंतर युरोप,अमेरिका वेगैरे देशात सार्विऋत मतदानांच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या.
त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांचा यश मिळाले. त्यानंतर पुढे जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला.
जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो- भारतातील पार्श्वभूमी
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्षे म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या व स्री संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणी जागतिक शांतता या हेतूने साजरा करवा यासाठी आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस व इतर देश
बहुतांश देशात आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा केला जातो,तर काहि देशांत जसे बल्गेरिया व रोमनिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई व आजी यांना भेटवस्तु देतात.
अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस / जागतिक महिला दिन का साजरा केला जातो त्या मागचा इतिहास पाहिला व आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरींने किंबहुना त्याही पेक्षा उत्तम प्रकारची कामगिरी करतांना आपण पाहत आहोत.
आपल्याला ही जागतिक महिला दिवस ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)