वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन | डायट ने वजन कमी कसे करावे >> आजकाल राहणीमान आणि खान पान च्या चुकीच्या पद्धती मुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम व्हायला लागले आहेत पूर्ण झोप नाही कधी पण जेवण करणे आणि काही पदार्थ असे आहेत जे आपण लोक सर्रास खात असतो आणि त्यामुळेच आपले वजन वाढत असते. आणि मग प्रश्न पडतो की कसे वजन कमी करायचे.
वजन वाढल्यावर कमी करण्यास पुष्कळ मार्गाचा अवलंब करतो पण कमी करणे फार अवघड होते कारण काही दिवस स्वतः वर कंट्रोल करतो आणि पुन्हा आपण आपल्या जिभेवर कंट्रोल करत नाही आणि जे आवश्यक नसते आणि वजन वाढण्यास कारणीभूत असते ते आपण खात जातो पण जर का आपण आपले लक्ष देऊन ते प्लान केले तर आपले वजन कंट्रोल होऊ शकते. त्यासाठी संतुलीत आहार घेणे देखील गरजेचे असते.
व्यस्त वेळापत्रकामुळे आणि कार्य स्थळांवरील दबावामुळे आजकाल तर लहान मुलं पण वजन वाढण्याच्या किंवा लठ्ठ पणामुळे त्रासलेले आहेत. वजन कमी करणे तसे सोपे आहे, वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम शाळेत जाऊन वर्क आऊट करणे या सारख्या अनेक पद्धती अवलंबतात. पण जर का आपणाला खरोखर वजन कमी कारचे असेल तर स्वतःवर व आपल्या खाण्यावर कंट्रोल असणे खूप आवश्यक आहे आणि हे करणे मात्र इतके सोपे नाही.
वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आपल्याला खाण्यावर कंट्रोल म्हणजे डाएट प्लान वर काम , योगा व वर्कआउट करणे. हे जर केले तर नक्कीच आपण वजन कमी करू शकतो त्यासाठी एक व्यवस्थित डाएट प्लॅन तयार करून त्याला फॉलो करायला पाहिजे.
लठ्ठपणा हा आता विश्वस्तरावर बीमारीचे कारण बनलेला आहे, आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही नियम आपल्याला पाळावे लागतील. या लेखामद्धे वजन कमी करण्यासाठी आम्ही काही गोष्टी आपल्याला सांगणार आहोत, त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच वजन कमी होईल आणि जर का प्लान काही महिन्यापर्यंत किंवा कायमस्वरूपी दैनंदिन आयुष्यात अवलंब केला तर दर महिन्याला किमान तीन ते चार किलो वजन कमी होऊन वजन कंट्रोल मध्ये राहील.
वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन / वजन कमी करण्याचे घरगुती उपाय / लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय / झटपट वजन कमी करण्याचे उपाय
महिन्याभरात किती वजन कमी केले जाऊ शकते
एका महिन्यात किती वजन कमी केले जाऊ शकते हे विभिन्न गोष्टींवर निर्भर आहे.जसे की त्या व्यक्तीचे वर्तमान शरीराचे वजन किती आहे, कोणत्या प्रकारचे डाएट आणि व्यायाम ती व्यक्ति अवलंबते या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
सर्व साधारण पणे दैनिक शारीरिक गतिविधि सोबत आहार आणि कॅलरी ची मात्रा यात संशोधन करून एका महिन्यात तीन ते चार किलो वजन कमी केले जाऊ शकते.
जर तुमचे सात दिवसात वजन कमी होत असेल असे जर तुमच्या निदर्शनात आले तर शरीरातील Fat कमी होत नसून पाणी कमी होत आहे असे समजावे आणि त्यामुळे मासपेश्या कमजोर होतात अशा प्रकारे वजन कमी केल्याने तुम्ही आजारी पडू शकता व कमजोरी येऊ शकते.म्हणून सामान्य रूपाने वजन कमी करायच्या आधी बॉडी मास इंडेक्स BMI ची गणना करणे आवश्यक असते. BMI नुसार आपण वजन कमी करू शकतो.
पुष्कळ लोकांना व्यायाम न करता वजन कमी करणे सोपे वाटते आणि मग ते लोक वजन कमी करण्यासाठी केवळ आहारात काही बदल करतात म्हणजेच डाएट प्लॅन ची साथ घेतात. पण डायट सोबत व्यायाम तेवढाच आवश्यक आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी.
वजन कमी करण्यासाठी / लठ्पणा कमी करण्यात डाएट प्लॅन ची भूमिका
आपल्याला जर का आपले शरीर तंदुरुस्त आणि shape मध्ये ठेवायचे असेल तर आपल्याला आपले राहणीमान आणि बदल करावा लागेल. वजन कमी करण्यामध्ये 40 टक्के व्यायाम आणि 60 टक्के भूमिका डाएट ची असते.
वजन कमी करण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये / वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा / पोट कमी करण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये
वजन कमी करताना गोड व तेलकट खाणे टाळावे.
चहा–कॉफी व साखरेचा कमी वापर करावा.साखरे ऐवजी गुळ खाणे चांगले.
शक्यतो पांढऱ्या रंगाचे अन्न पदार्थ कमीतकमी खावेत, जसे की मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या. तसेच बटाटा, चॉकलेट, तेल, तूप, बटर, यांसारखे अन्न पूर्णपणे टाळू नका, पण आहारात यांचे प्रमाण कमी ठेवा.
मिठाई व बिस्कीट खाणे टाळावे.
सोडियम व मीठ ज्या मध्ये असेल ते अन्न कमी खावे. कमी मीठ खाल्ल्याने वजन कमी होते व आपण स्वस्थ पण राहतो. सोडियम व मीठ ऐवजी आपण पोटॅशियम युक्त अन्न जसे केळ खाऊ शकतो.
ग्रीन टी चा उपयोग
रोज दोन कप ग्रीन टी प्याल्याने पण वजन कमी होण्यास मदत होते ह्यात उपस्थित caffine ठीओब्रोमिने, सेपोनिन, थिओफिलीन , व्हिटॅमिन आपल्या metabolism रेट वाढून आपली भूक कमी करतात.
Tetley Green Tea Packet, 500g
Organic India Classic Tulsi Green Tea, 100 gm
Metabolism कसे वाढवावे
१) पूर्ण झोप घेणे आवश्यक असते यामुळे आपला मेटाबोलिजम प्रभावित होत असते म्हणून आठ तास झोप घेणे गरजेचे असते.
२) उपाशीपोटी नाही राहावे, एकावेळी न खाता थोडा-थोडा करून खावे.
३) सतत दिवसभर पाणी पीत राहायला पाहिजे यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडून शरीर निरोगी होते.
४) उपाशी राहिल्यामुळे आपण काही पण खातो आणि शरीरातील टॉक्सीन बाहेर पडून शरीर निरोगी होते.
अन्न घेण्यात बदल करावा
मेटाबोलिजम जर बरोबर असेल तर वजन कमी करण्यास मदत होते. मेटाबोलिजम व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे.
दिवसभर एक सारखे अन्न नाही खायला पाहिजे त्यात भिन्नता असली पाहिजे.
सकाळी नाश्ता मध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन्स युक्त आहार घ्यावा. शक्यतो सकाळच्या नाश्ता मध्ये मिठाई चा समावेश नसावा. सकाळच्या नाश्ता मध्ये तुम्ही पोळी किंवा ब्रेड देखील घेऊ शकता. तसेच दूध व सलाड जसे काकडी, गाजर घेतल्यास ते देखील योग्य राहील. सर्व साधारण पणे सकाळच्या नाश्ता मधून तुमच्या शरीराला ५०० च्या जवळ पास कॅलरीज मिळतील असा तुमचा नाश्ता असावा.
दुपारी जेवणात फायबर असलेला आहार घ्यावा. दुपारच्या जेवणातून तुमच्या शरीराला सर्व साधारण पणे ३०० – ४०० कॅलरीज ची आवशकता असते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दोन पोळ्या किंवा थोडा भात खाऊ शकता. त्याच बरोबर सलाड,पालेभाज्या यांचा देखील समावेश तुम्ही दुपारच्या आहारात करू शकता.
रात्री जेवणात कार्बोहायड्रेट युक्त आहार कमी असावा. रात्रीचा आहार हा शक्यतो कमीच असावा. रात्रीच्या आहारात भाता सारखे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ न खाल्लेले च तुमच्या साठी चांगले असेल.
डायट प्लान नुसार दैनंदिन आहार कसा असावा / वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता / वजन कमी करण्यासाठी काय खावे
नाश्ता डाएट / वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता
१) सकाळी कोमट पाण्यामध्ये मध व लिंबू टाकून प्यावे.
२) दूध आणि पोहा, सुजी, उपमा खावा किंवा कमी तेलाचा पराठा खावा.
३) मोड आलेले कडधान्य पण खायला उत्तम आहे. हे खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा राहते आणि शरीरात स्पूर्थी निर्माण होऊन दिवसभर भूक कमी लागते.
४) आपण इडली दोसा पण खाऊ शकतो.
दुपारचे जेवण किंवा डायट
१) संतुलित जेवण करावे भाज्या, सलाड, भात, डाळ, पोळी, दही यांचा समावेश करावा.
२) भाज्यांचा जास्त समावेश करावा.
३) त्यात भात आणि फळांचा समावेश करावा
४) नॉनव्हेज मध्ये अंडे ,मासे आणि चिकन खाऊ शकतो.
५) लोणचे पापड खाणे टाळावे स्नॅक्स सुके मेवे आणि फळ खाऊ शकतो.
६) संध्याकाळी थोडा चहा कमी साखरेचा किंवा गुळाचा घ्यावा व डाएट बिस्कीट खावे.
रात्रीच्या जेवणा मध्ये काय खावे
१) कधी पण रात्री जेवण कमी करावे.
२) रात्रीच्या वेळी कोणतेही मेहनतीचे काम करत नाही आणि फक्त आपण त्या वेळेस झोपायचे काम करतो त्यामुळे शरीराला तेवढी अन्नाची गरज नसते.
३) भाजी डाळ आणि दोन पोळ्या खाव्यात.
४) याच्या सोबत एखादा वाटी सूप पण घेऊ शकतो.
५) एक सफरचंद रात्रीच्यावेळी खाऊ शकतो किंवा कोणतेही एक फळ.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम / वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत
आठवड्यातून किती दिवस व्यायाम करावे.
आठवड्यातील ७ दिवसांपैकी सर्वच ७ दिवस व्यायामात सातत्य ठेवणे कधीही चांगलेच परंतु सुरवातीच्या काळात व्यायामाची सवय नसल्या मुळे अंग दुखू शकते,त्यामुळे सुरवातीचा किमान १ महिना तरी आठवड्यातून १ दिवस व्यायामाला सुट्टी घेतली तरी हरकत नाही.
रोज किमान ३० ते ४० मि. घरीच व्यायाम केला पाहिजे.किंवा जर तुम्ही जिम मध्ये जात असाल तरी काही हरकत नाही. ३० मि. योगा आणि ३० मि. वॉक केल्याने महिन्यांमध्ये वजन कमी व्हायला मदत होते.
योगा केल्याने वजन कसे कमी होईल
१) कॉर्डीयो योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग योगा पण केल्याने वजन कमी होऊ शकते.
२) वेगळ्या योग मुद्रा करून आणि आपण शरीरातील मांसपेशी मजबूत बनवू शकतो.
३) योगा मुळे मसल्स आणि शरीरातील स्नायू दुखण्यावर पण आराम पडतो.
४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली बुद्धी तल्लख होऊन शरीर मजबूत बनते.
५) योगामध्ये अर्ध चंद्रासन ,वीरभद्रासन, उत्कटासन ,वृक्षासन आणि अर्ध मात्स्येंद्रसेन करू शकतो.
६) वीरभद्रासन मुळे जांघांच्या जवळील वासा कमी होते.
७) या व्यतिरिक्त आपण रोज कमीत कमी वीस राऊंड सूर्यनमस्कार करून वजन कंट्रोलमध्ये करू शकतो.
व्यायाम नंतरचे डायट
१) जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात.
२) जेवढी तुमची कॅलरीज बर्न होतील तेवढ्या मात्रे मध्ये आहार घेणे गरजेचे असते.
३) वर्क आऊट करत आहे म्हणून अति खाणे हा काही उपाय नसतो .
४) तुम्ही वर्क-आऊट करताना किती मेहनत केली त्यानुसार आहार घेतला पाहिजे.
तात्पर्य – वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन
अश्या प्रकारे वजन कमी करण्यासाठी आपण आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल केला तर नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल. आणि जर आपण वरील डाएट बद्दल दिलेले नियम पाळले तर नक्कीच आपले शरीर तंदुरुस्त होईल आणि निरोगी राहून लठ्ठपणा पासून आपला सुटकरा होईल. म्हणून ह्या साठी स्वतःवर ताबा असणे गरजेचे असते कारण जर का आपला स्वतः वर ताबा नसेल तर शरीराला आवश्यक नसते ते अन्न आपण खातो आणि शरीर लठ्ठ होऊन वजन वाढते आणि मग ते कमी करणे अवघड होते.आणि त्यासाठी आपली इच्छाशक्ती देखील तितकीच मजबूत असणे आवश्यक असते .
वजन कमी करण्यासाठी काय खावे
वजन कमी करण्यासाठी शक्यतो सकाळी नाश्ता मध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन्स युक्त आहार घ्यावा. सकाळच्या नाश्ता मध्ये मिठाई चा समावेश नसावा. सकाळच्या नाश्ता मध्ये तुम्ही पोळी किंवा ब्रेड देखील घेऊ शकता. तसेच दूध व सलाड जसे काकडी, गाजर घेतल्यास ते देखील योग्य राहील.
दुपारी जेवणात फायबर असलेला आहार घ्यावा. दुपारच्या जेवणातून तुमच्या शरीराला सर्व साधारण पणे ३०० – ४०० कॅलरीज ची आवश्यकता असते. त्यामुळे दुपारच्या जेवणात दोन पोळ्या किंवा थोडा भात खाऊ शकता. त्याच बरोबर सलाड,पालेभाज्या देखील तुम्ही दुपारच्या आहारात घेऊ शकता.
रात्री जेवणात कार्बोहायड्रेट युक्त आहार कमी असावा,भाता सारखे कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ न खाल्लेलेच तुमच्या साठी चांगले असेल. रात्रीचा आहार हा शक्यतो कमीच असावा.
तसेच चहा पिणे तुम्ही टाळा आणि त्या ऐवजी ग्रीन टी घ्या.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)