श्रावण महिना माहिती व श्रावण महिन्याचे महत्त्व – संपुर्ण माहिती

श्रावण महिना माहिती मराठी व श्रावणाचे महत्त्व (sravan mahina mahiti marathi) >> सौर वर्षामध्ये बारा महिने असतात त्यांना आपण मराठी महिने असे म्हणतो या प्रत्येक महिन्याचे काही ना काही वैशिष्टय किंवा वेगवेगळेपणा आहेच. तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. त्यामुळे श्रावण महिना प्रत्येकाला आवडतो. आणि हा महिना आला की पुढच्या महिन्यात येणा-या गणपती सणांची आतुरता होते.

श्रावण महिना माहिती मराठी (sravan mahina mahiti marathi)

हिंदू धर्मा मध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे या महिन्या मध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदित करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच या श्रावण मासा मध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते. याच श्रावण महिण्याविषयी माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

श्रावण महिना माहिती – श्रावणातील निसर्ग

श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र  वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउस सुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा छान असते.

श्रावण महिन्यात अनेक पक्षी आनंदाने झाडावर, वेलींवर आढळून येतात. या महिन्यात पाउस तर पडतोच, तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कधी पाउस पडतो तर कधी लगेच ऊन पडते हे पाहायला मला तरी खुप आवडते. या महिन्यामध्ये आकाशात कधी कधी इंद्रधनुष्यही पाहायला मिळते आकाशात ढग पाहून मोरही आनंदाने नाचताना पाहायला मिळतो.

निसर्गात सकाळी अनेक पक्ष्यांचे मंजुळ आवाज कानी येतात.

या महिन्यात अनेक शाळा परिसर भेटीचे आयेाजन करतात. निसर्गाच्या सौदर्यंची ही लयलूट पहायला पर्यटक अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात. डोंगरातून कोसळणारे उंच धबधबे, रानफुलांनी सजलेले माळ, उनसावलीचा खेळ इ. दृश्य पाहायला खुप छान वाटते.

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो पीकांची राखण सुरू होते. असा हा श्रावण महिना निसर्गातील विविध सौंदर्यानी बहरलेला पाहायला मिळतो.

श्रावण महिन्यातील सण, उत्सव

श्रावण महिना माहिती मराठी  (sravan mahina mahiti marathi)

श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात. अनेक महिला या महिन्यात देव- देवतांची उपासना करतात. असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद, उत्साह पसरवतो. प्रत्येकास नवचैतन्य देतो, सर्वाना तो हवाहवासा वाटतो. शिवामुठच्या व्रताने दर सोमवारी तांदुळ, तीळ, मुग, जवस आणि सातु अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात.

श्रावण महिना माहिती मराठी  (sravan mahina mahiti marathi)

श्रावणातील सणांची सुरवात नागपंचमीच्या सणाने होते. नागपंचमीच्या निमित्ताने मोकळया निसर्गात जाणे प्रकृतीसाठी चांगले असते. आणि ते झाल्यानंतर झिम्मा, फुगडी खेळतात.या सणाला स्रिया नवनवीन वेशभूषा करून नवीन दागिने परिधान करून वारुळाला जाऊन नाग देवतेची पुजा करतात.

त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षात येणार्‍या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा‘ म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणा-या कोळी बांधवासाठी हा खास सण ज्याच्यावर संपूर्ण कुंटूबाचे जीवन अवलंबून असते अशा या ‘समिंदराला‘ यादिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो.

रंगबेरंगी पांरपारिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो दर्याला नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी हेाडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.

नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन हा सण देखील असतो. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्यात असलेले महत्व अधोरेखित करणारा हा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते व राखी बांधते आणि भावाला राखी बांधल्यावर त्यांच्या कडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते.

त्यानंतर येणारा श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव / गोपाळकाला. या सणाला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो व त्यानंतरच्या दिवशी दहीहंडी सर्वात उत्साहात साजरी होते. अनेक तरुण मंडळे ही वर बांधलेली दहीहंडी फोडण्या साठी मनोरे लाऊन प्रयत्न करतात. आणि हा दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक देखील गर्दी करतात. अतिशय उत्साही आणि आनंदित करणारा श्रावणातील हा सण आहे.

श्रावण महिना माहिती मराठी  (sravan mahina mahiti marathi)

अनेक कवीनी श्रावण महिन्यावर सुंदर कविताही केल्या आहेत त्यातली एक –

हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला

हे गाणं सुध्दा या श्रावण महिन्यावर कवीनी गायलेले हे सुंदर गाणे आहे या सुंदर कविता व गाणी सतत ऐकाविसी वाटतात.

असा हा श्रावण महिना मला पुन्हा पुन्हा यावा असेच हिंदू धर्म मानणार्‍या प्रत्येकाला वाटत असावे.

देव देर्शना निघती ललना हर्ष माईना हदयात

श्रावण महिन्याचे गीत गुणगुणत महिनाभराच्या या आंनदात्सवाची सुरूवात होते.

‘येता वर्षासरी चिंब आठव दारले उरी
मन वेडे घेई हिंदोळे, माझीया माहेरी
पंचमीला गं बांधून झुला
श्रावण आला सखे श्रावण आला……….‘

सारांश – श्रावण महिना माहिती मराठी

श्रावण महिना माहिती मराठी आपण या लेखामध्ये पहिली, असा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला व हिंदू सणांनी बहरलेला श्रावण मास संपता संपता गावातील मंदीरामध्ये सुरू झालेल्या श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते. विवाहित स्रिया ज्या श्रवणात मंगळागौर व इतर सण साजरे करण्यासाठी माहेरला जातात त्या आता श्रावण मास संपल्यावर सासरी परततात व गौरी गणपतीच्या तयारीला लागतात. वेगवेगळे सण उत्सव हे आनंद देण्यासाठी व भरभराटीसाठी असतात. ते माणसांना एकत्रित बांधतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top