नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, की आजच्या काळात अनेक यंत्र सामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागल्याने, अनेक बेरोजगार किंवा अल्प भूधारक लोकांना व्यवसायाच्या तसेच अर्थाजन म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न सुधारण्याच्या अनेक संधी आणि मार्ग हे उपलब्ध झालेले आहेत, किंबहुना अनेक प्रकारच्या व्यवसायांचे दालनच उघडले आहे.
परंतु या दालनातून म्हणजेच व्यवसायांच्या दारातून आत प्रवेश करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, व्यवसायाच्या ज्या संधीची, ज्या व्यवसायाची तुम्ही निवड केली आहे, त्या व्यवसाय विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे, हे अत्यंत गरजेचे आहे, आणि निश्चितच त्यासाठी तुम्हाला ही माहिती अतिशय फायदेशीर ठरणारी आहे.
“शेळीपालन व्यवसायाचा मंत्र eBook खरेदी करण्यासाठी खालील “शेळीपालन eBook” या बटन वर क्लिक करा. “
व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या या संधीतीलच एक व्यवसाय म्हणजे “शेळी पालन व्यवसाय” या व्यवसायाविषयी ची संपूर्ण माहीती म्हणजे, ‘ शेळी पालन व्यवस्थापन, शेळी पालन खर्च, शेळी पालन माहिती आणि शासनातर्फे शेळी पालन या व्यवसायसाठी देण्यात येणारे कर्ज’ या विषयीची संपूर्ण माहिती अगदी विस्तृत स्वरुपात तुमच्या पर्यंत पोहचवण्याच्या उद्द्येशाने आणि तुमच्या यशाचा मार्ग सोयीस्कर करण्याकरिता, आम्ही ही माहिती पुस्तिका तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. या पुस्तिकेची नक्कीच तुम्हाला ‘शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आणि शेळी पालन व्यवस्थापन करण्यासाठी मदत होईल.
चला तर मग, पाहूया माहिती……
शेळी पालन या व्यवसाया विषयी…..
शेळी पालन माहिती / शेळी पालन
शेळी पालन हा व्यवसाय आपल्या देशात बर्याच वर्षांपासून चालत आलेला आहे. भारत हा कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो, म्हणजेच आपल्या देशात बरेच लोक शेती करतात, त्यापैकी काही अल्प भूधारक किंवा कोरडवाहु शेती करणारे असतात, तर काही ऋतुनुसार शेती करणारे लोक आहेत. जर तुमच्या कडे जमीन कमी असेल, भांडवल कमी असेल, रोजगारी करणारे मनुष्यबळ कमी असेल, तर तुम्ही अवश्य ‘शेळी पालन व्यवसाय’ करण्याचा विचार करावा, कारण या व्यवसायात बराच फायदा आणि नफा प्राप्त होतो, त्याच बरोबर सरकार कडून आर्थिक सहाय्य म्हणजेच कर्ज देखील मिळते.
शेळी पालन हा व्यवसाय करण्यासाठी कोणते आणि किती कर्ज दिले जाते, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, शेड कोणते घ्यावे, याची माहिती आपण पुढे वाचणारच आहोत, परंतु सुरूवातीला शेळी पालन म्हणजे काय? शेळी पालन माहिती काय आहे, हे पाहूया.
तर, शेळी पालन म्हणजे ज्या प्रमाणे गाई, म्हैस यांचे पालन करून, संगोपन करून, त्यांच्या पासून मिळणार्या दुधाचा वापर केला जातो, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गाय आणि म्हैस, यांचे पालन केले जाते, मांस आणि अंडी साठी कोंबडी चे पालन करून “ कुक्कुट पालन व्यवसाय” केला जातो.
अगदी त्याच प्रकारे शेळी पालन व्यवसायात शेळीचा दूध मिळवण्यासाठी आणि शेळी उत्पत्ती करण्यासाठी उपयोग केला जातो व शेळीची पुरुष जात म्हणजे, बकरा नर, याचा शेळीच्या जातीचे प्रजनन करण्यासाठी व मांसाहारी लोकांना मांस पुरवण्यासाठी वापर केला जातो. त्याद्वारे बर्यापैकी उत्पन्न मिळवले जाते. या प्रकारे अर्थार्जन करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी एक शेड करून त्या ठिकाणी शेळी म्हणजेच बकरी आणि बकरे यांचे पालन केले जाते, त्यास “शेळी पालन” किंवा “शेळी पालन व्यवसाय” असे म्हणतात. याच व्यवसायास “बोकट पालन” या नावाने देखील ओळखले जाते.
शेळी पालन माहिती या संक्षिप्त उतार्या नंतर विस्तृत स्वरुपात सांगायचे झाल्यास, शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी, एकाच प्रकारच्या अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या घेण्याची गरज असते, त्या किती घ्याव्यात हे आपण आपल्या आर्थिक नियोजना नुसार ठरवावे. शेळी कमी गाईच्या तुलनेत कमी चारा खात असल्याने आणि बर्या पैकी दूध देत असल्याने तुम्ही 20 ते 50 शेळी घेऊ शकता. एका गाई साठी जेवढा चारा दिवसभरात लागतो तेवढ्यात दहा बकरींचा चारा पुरतो, असा साधारण अंदाज आहे, त्यावरून तुम्ही अंदाज लावावा.
शेती पालन हा व्यवसाय करण्याच्या दोन पद्धती प्रचलित आहेत, एक म्हणजे परंपरागत पद्धत (मोकाट शेळी किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन पद्धत आणि दुसरी बंदिस्त शेळी पालन पद्धत. परंपरागत म्हणजे अर्धबंदिस्त पद्धती मध्ये, दिवसभर शेळ्या मोकळ्या चरण्यासाठी सोडल्या जातात, त्यांच्या मागे राखणदार म्हणून एक माणूस ठेवला जातो व रात्री शेड मध्ये आणून बांधून ठेवल्या जातात. तर बंदिस्त शेळी पालन पद्धती मध्ये शेळयांना शेड मध्ये बांधून ठेवले जाते आणि तिथेच चारा पाणी दिले जाते, परंतु ही पद्धती महाग समजली जाते, परंतु यासाठी सरकार कडून कर्ज दिले जाते.
जर तुम्हाला शेळी पालनाच्या दुसर्या पद्धतीने शेळी पालन व्यवसाय करायचा असेल तर, ज्या प्रमाणे मानवाला योग्य आहार, पाणी आणि निवारा म्हणजे राहण्यासाठी योग्य जागा यांची गरज असते, तसेच प्राण्यांना देखील असते, त्यामुळे शेळी पालन करण्यासाठी योग्य जागा, मुबलक पाणी आणि ऊन, वारा पाऊस, थंडी यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य जागी, योग्य शेड ची उभारणी करावी. आता पुढील माहितीत पाहूया शेळी पालन व्यवसाय कसा करावा, या विषयीची माहिती-
शेळी पालन व्यवसाय
शेळी पालन हा व्यवसाय भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जास्त प्रमाणात केला जाणारा, आणि जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय समजला जातो, आणि तो योग्य प्रकारे केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. शेळी पालन या व्यवसायात शेळीचे दूध, मांस, खत, शेळीची त्वचा आणि केस इत्यादींचे उत्पादन केले जाते. तर आता सुरूवातीला पाहूया शेळी पालन करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींची आवशक्यता असते-
शेळी पालन साठी आवश्यक घटक
चांगल्या प्रतीच्या आणि जातीच्या शेळीची निवड करणे
चांगल्या प्रकारच्या जातींच्या शेळी ची निवड करणे हे तुमचा व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता पाहूया चांगल्या जातीच्या शेळी कोणत्या आहेत, उस्मानाबादी शेळी, संगमनेरी शेळी, शिरोहि शेळी आणि आफ्रिकन शेळी. यात आफ्रिकन शेळी ही फायदेशीर ठरणारी शेळी आहे, कारण ही जुळ्या बकऱ्याना जन्म देते. आणि विकल्यास या शेळी ला 350 ते 400 रुपये किलो भाव मिळतो.
शेड ची उभारणी करणे
चांगल्या प्रकारे आणि आणि योग्य जागी शेड ची उभारणी करणे हे देखील महत्वाचे आहे, त्यासाठी जर तुम्ही पारंपारिक म्हणजे मोकाट शेळी पालन करणार असाल, तर शेळी दिवसभर बाहेर असल्याने कच्चे शेड केले तरी चालेल. तसेच जर टूम,ही बंदिस्त शेळी पालन करणार असाल तर, 20-25 शेळ्या आणि एक बोकड पालन साठी 30 feet लांब आणि 16 feet रुंद शेड करावे। हे शेड बांबू, किंवा सिमेंट किंवा लोखंडी जाळी वापरुन करू शकता. सुरुवातीला जास्त खर्च न करता, कमी खर्चात साधारण शेड करावे.
नर शेळी खरेदी करणे
शेळीच्या प्रज्योत्पादनासाठी आणि शेळींच्या संख्येत वाढ होण्यासाठी एक चांगल्या प्रतीची नर शेळी खरेदी करणे. शेळीच्या संख्येत प्रजनन द्वारे वाढ होण्यासाठी, एक चांगल्या जातीच्या नर बकऱ्याची, बोकडची खरेदी करावी.
राखणदार किंवा रोजंदारीवर माणूस ठेवणे
शेळींच्या आरोग्यासाठी साफ सफाई साठी आणि देखरेखी साठी एक राखणदार ठेवणे. रोजाणे किंवा महिनेवारी ने, बकरीची साफ सफाई आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक माणूस ठेवावा. त्यामुळे तुमच्या बकारींचे इतर प्राण्यांपासून रक्षण होईल. तसेच वेळोवेळी शेळयांचे लसीकरण करणे यांसारखी कामे ती व्यक्ती करू शकेल.
पशू- प्राधिकरण प्रमाणपत्र घेणे
भारतात बरेच लोक हा व्यवसाय अगदी लिगल पद्धतीने करतात, तुम्हाला माहितीच असेल तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त, कोणत्याही प्रकारच्या प्राण्याचे संगोपन पालन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पशूसंवर्धन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, त्यावरून ते तुम्हाला एक प्रमाणपत्र देतील, आणि पशुधन ठेवण्याची परवानगी देतात.
प्राधिकरण विभागाकडून हे प्रमाणपत्र दोन वर्षासाठी दिले जाते, हे तुम्हाला शेजारी असणार्या लोकांच्या त्रासापासून वाचवण्यास मुक्त करण्यास मदत करतील, आणि तुमचा व तुमच्या व्यवसायचे संरक्षण करतील. या प्रमाणपत्रा सोबतच तुमच्या कडे जर पशुधन पाळण्याचे झोनिंग कायदे असतील, तर त्याचा परवाना तुमच्या कडे असणे देखील महत्वाचे आहे.
तर या वरील सर्व गोष्टींची उभारणी करून तुम्ही शेळी पालन व्यवसाय करू शकता.
शेळी पालन खर्च
शेळी पालनाचा खर्च हा शेळी पालनाच्या ज्या दोन पद्धती आहेत, त्यावर अवलंबून आहे. आपण वर पाहिले की, शेळी पालन करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक पारंपारिक आणि दुसरी बंदिस्त पद्धत. त्यापैकी पहिली पारंपारिक म्हणजे मोकाट शेळी पालन, ही कमी खर्चाची समजली जाते. तर बंदिस्त पद्धतने शेळी पालन करणे हे खर्चाचे समजले जाते.
शेळी पालन खर्च हा तीन भागात विभागला जातो. शेड, चारा, आणि लसीकरण शेळी पालन करत असताना, कमी खर्चात शेड बांधण्याचा विचार करावा, त्यापेक्षा बकरीना चांगल्या प्रकारचा चारा आणि सर्व प्रकारच्या लसी द्याव्या. शेळीना रोग झाल्यास त्यावर बऱ्याच खर्च येऊ शकतो, त्यामुळे कोणताही आजार न होण्यासाठी ET, FMD, TT आणि PPR या लसी दिल्या जातात.
चारा पुरवण्यासाठी तुम्ही जास्त चारा लावावा, किंवा मका, कडबा, तसेच काही सुका आणि ओला कचरा लावावा, म्हणजे तुम्हाला खर्च कमी प्रमाणात येईल.
शेळी पालन शेड
शेळी पालन करण्यासाठी ज्या प्रमाणे माणसाला राहण्यासाठी निवारा लागतो, त्याच प्रमाणे पशू आणि प्राणी यांना राहण्यासाठी योग्य जागेची गरज असते, त्यासाठी तुम्हाला योग्य शेड टाकावे लागते. शेळी पालन शेड टाकण्यासाठी, तुम्हाला दोन पद्धती प्रमाणे, शेड घ्यावे लागते, ज्या शेतकारींना जमीन कमी आहे, आणि खर्च करण्याची क्षमता कमी आहे, त्यांनी या पारंपारिक मोकाट शेळी पालन करावे, यात शेळी पालन शेड हा कमी खर्चाचा म्हणजे शेतातील बांबू, काड्या , पालापाचोळा, तसेच इतर अनावशक घटक वापरुन बनवू शकता.
बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी बनवण्यात येणारे शेड हे पक्के असावे आणि त्यामुळे ते जास्त खर्चीक ठरते. साधारण पाने 20 ते 25 बकरी आणि एक बोकड साठी 30 feet लांब आणि 16 feet रूंदण शेड असावे. शेड च्या चारीही बाजूने कुंपण असावे, म्हणजे इतर हिंस्र पशूचा धोका राहणार नाही.
30 X 16 चे शेड तुम्ही 10 बकऱ्यांसाठी साधारण साहित्य वापरुन बनवू शकता, जसे लाकडी बांबू, सिमेंट चे खांब, ऊसाची पाचट. सुरुवातीला जे 2 लाख भांडवल असेल तर फक्त 40 ते 50 हजारच शेड साठी खर्च करावा.
शेळी पालन व्यवस्थापन
शेळी पालन व्यवस्थापन करत असताना, काही बाबींचा विशेष आणि योग्य अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्ही जो प्रकल्प हाती घेतला आहे, त्यानुसार योग्य व्यवस्थापण करावे. शेळी पालन व्यवस्थापन करत असताना एक लक्षात असावे, कि एकूण रकमेच्या 75 % रक्कम शासनाकडून कर्ज च्या रूपात मिळते उर्वरित 25 % रक्कम तुमच्या कडे असणे महत्वाचे आहे.
- ज्या ठिकाणी तुम्ही बंदिस्त पद्धतीने शेळी पालन व्यवसाय करणार आहेत, ते ठिकाण शहरापासून दूर असावे.
- शेळी ला काही आजार झाल्यास लगेच उपचार मिळेन याची सोय करावी.
- शेळी पालन च्या जागी वीज पुरवठा आणि पाणी मुबलक असावे.
- शेळी विकत घ्यायची असल्यास किंवा विकायची असल्यास बाजारपेठ शेळी पालन पासून जवळ असावी.
- राखणदार किंवा कामगार म्हणून तुमच्या कडे चांगल्या कामागरची सोय असावी, पशुवैद्यकीय सुविधा जवळ असाव्या.
- तुमच्या या व्यवसाय विषयी तुम्हाला थोडे प्रशिक्षण आणि ज्ञान असावे.
- शासनाच्या योजना आणि कर्ज यांची माहिती घेऊन, तुम्हाला त्या कर्जाची प्राप्ती झालेली असावी.
- तुम्हाला तुमच्या व्यवसायाला पुरेसा वेळ देता यावा.
शेळीपालन कर्ज
आपल्या भारतातील शेतीची प्रगति आणि शेतीतील अडचणी पाहता, शेळी पालन करण्यासाठी शासनाकडून बर्या पैकी मदत केली जाते. आपल्या भारतात, महाराष्ट्र राज्यात, केंद्र सरकार कडून शेळी पालनासाठी सर्व पशू व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी जवळपास 35% पर्यंत कर्ज दिले जाते.
तर पशू संवर्धन खात्याद्वारे, जवळपास 20 ते 25 टक्के कर्ज दिले जाते, त्यासाथी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या राबवल्या जातात, आणि अल्प-भूधारक तसेच कोरडवाहू शेती करणार्या बर्याच शेतकर्याच्या उत्पन्नात भर टाकण्याचा मोलाचा वाटा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून राबवल्या जातात.
सरकार मार्फत देण्यात येणार्या या सर्व योजनाचे आणि लाभाचे फायदे घेण्यासाठी, पशू संवर्धन विभागातर्फे कर्ज घेण्यासाठी सोपी पद्धत काढली आहे, हे कर्ज कसे घ्यावे आणि कोणत्या योजना आहेत हे आता पाहूया-
शेळीपालन कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज करण्यासाठी पशू प्राधिकरण कडून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम ही, लाभरथींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
शेळी पालन व्यवसायासाठी खुल्या प्रवर्गातील लोकाना 50 टक्के अनुदान दिले अजते तर अनुसूचित जाती जमातीच्या लोकाना 74 टक्के कर्ज दिले जाते. त्याचा एक सामान्य उताराआपण खाली पाहू शकतो-
100 मादी आणि 5 नर असल्यास | 10 लाख रुपये |
200 मादी आणि 10 नर असल्यास | 20 लाख रुपये |
500 मादी आणि 25 नर असल्यास | 50 लाख रुपये |
शेळीपालन कर्ज घेण्यासाठी पात्रता
- रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्राचे असावे.
- अर्जदारणे आधी कोणतेही शेळी पालन साठी कर्ज घेतलेले नसावे.
- अर्जदारकडे स्वतः च्या मालकीची शेळी पालन करण्यासाठी 9000 मीटर जागा असावी.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदारकडे चाऱ्याची व्यवस्था आणि चारा लावण्याची जागा असणे गरजेचे आहे.
- अर्जदारला जातीचा दाखला देणे बंधनकारक आहे.
- अर्जदारचा आधार मोबाइल लिंक असणे आणि मोबाइल बँक खाते लिंक असावे.
- एक कुटुंबातील एक च व्यक्ति अर्ज करू शकतो.
सारांश
या लेखामध्ये शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आवश्यक संपुर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,जसे की कोणत्या प्रतीच्या आणि जातीच्या शेळीची निवड केली पाहिजे,शेड ची उभारणी कशी करावी,एकूण खर्च किती येऊ शकतो, या व्यवसायाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे आणि कर्ज कसे मिळेल अशा अनेक गोष्टींची माहिती बघितली.
आपल्याला जर या व्यवसायामध्ये अधिक रुची असल्यास आणि अधिक विस्तृत स्वरुपात माहिती हवी असल्यास आपण आमचे शेळी पालन व्यवसायाचा मंत्र हे eBook खालील बटन वर क्लिक करून खरेदी करू शकता.
शेळीपालन व्यवसायाचा मंत्र eBook खरेदी करण्यासाठी खालील “शेळीपालन eBook” या बटन वर क्लिक करा.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.