डास मारण्याचे घरगुती उपाय | डास नियंत्रण करण्यासाठी काही उपकरणे >> तुमच्या घरच्या आजूबाजूला अस्वच्छता वाढली की डास देखील वाढतात. डासांची उत्पती वाढल्यामुळे आपल्याला डेंगू, मलेरिया, चिकनगुण्या यांसारख्या असंख्य आजारांना सामोरे जावे लागते.
यांसारख्या डासांमुळे उत्भवनार्या आजरांपासून वाचण्यासाठी तुम्हाला डासांपासून वाचने गरजेचे आहे. डासांपासून वाचण्यासाठी किंवा डास मारण्याची अनेक आधुनिक उपकरणे देखील आहेत. त्याचबरोबर तुम्ही घरच्या घरी देखील काही उपाय करू शकता आणि तुमचे, तुमच्या बाळाचे व घरच्यांचे डासांपासून संरक्षण करू शकता.
या लेखामध्ये सुरवातीला डास मारण्याचे घरगुती उपाय कोण कोणते आहेत ते पाहुयात आणि त्यानंतर डास मारण्यासाठी बाजारात काही आधुनिक उपकरणे आहेत ती बघूयात .
चला तर मग बघूयात डास मारण्याचे घरगुती उपाय कोणते आहेत.
डास मारण्याचे घरगुती उपाय (Home remedies to kill mosquitoes) / डास नियंत्रण उपाय व त्यांचा योग्य वापर
मच्छर / डास मारायचे बरेच उपाय करून झाले आहेत पण तरी देखील काही फरक पडत नाहीये, मच्छर तुमचे रक्त पितच आहेत. अगरबत्ती वापरली तर त्याचा धूर सहन होत नाहीये मग बॅट वापरली तर मच्छर मारायच्या बॅटचे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर मग आता डास माराण्याचे घरगुती उपाय करून पहा.खाली मच्छर / डास मारण्यासाठी किंवा पळवण्यासाठी काही घरगुती उपाय दिलेले आहेत ज्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
कापुर – डास मारण्याचे सर्वोत्तम घरगुती उपाय
कापुर किंवा कापुरचा धूर हा डास मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी योग्य आहे. घरात दारे खिडक्या बंद करून कापुर जाळा, १० – १५ मिनीट हा धूर घरात राहुद्या. डास मारतील किंवा पळून जातील. डास मारण्याचे जे काही घरगुती उपाय आहेत त्यातील हा सर्वात सोपा आणि किफायतशीर उपाय आहे.
यांखेरीस कापुर वापरुन डास मारण्याचे आणखी बरेच घरगुती उपाय तुम्ही करू शकता. जसे की कापुर बारीक करून त्यामध्ये हार्डवेअर च्या दुकानात मिळणारे तरपिन तेल मिसळा. कापुरची केलेली पुड त्या तेलात पुर्णपणे विरघळली आहे का याची खात्री करून घ्या आणि हे तयार केलेलं मिश्रण घरातील जुण्या एखाद्या ऑल आऊट च्या किंवा इतर कोणत्या कंपनीच्या रिफील मध्ये भरा आणि रिफील लाऊन टाका. हा उपाय तुमच्या आरोग्यास हानिकारक नसून या मधील कापुर डासांबरोबर इतर किटके देखील मारेल.
या व्यतिरिक्त संध्याकाळी जर तुम्ही घरात धूप वगैरे जाळत असाल तर त्यामध्ये कापुर टाकला तरी घरातील डास नियंत्रण होईल.
कडूलिंब – डास मारण्या साठी अत्यंत फायदेशीर घरगुती उपाय
कडूलिंब हे माणसाचे शरीर सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. ह्याच कडूलिंबाचा उपयोग आपल्याला डास मारण्यासाठी घरगुती उपाय म्हणून देखील करता येऊ शकतो. कडूलिंबाचे तेल खोबरेल तेलात मिसळून अंगाला लावल्यास डास तुमच्या आजूबाजूला फिरकणार पण नाहीत.
कडूलिंबाचा वास तुम्हाला डासांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. अशा प्रकारच्या मिश्रित तेलाचा परिणाम म्हणून हे तेल लावल्यावर कमीत कमी ६ ते ७ तास तरी डास तुम्हाला चावणार नाहीत. यांखेरीस कडूलिंबापासून अन्य उपाय म्हणजे कडूलिंबाचा रस तुम्ही रिफिल मध्ये घालून देखील वापरू शकता.
लवंग तेल
लवंग ही जशी खोकल्यासारख्या शारीरिक व्याधींसाठी उपयुक्त आहे. त्याच प्रमाणे लवंग तेलाचा उपयोग तुम्ही डास मारण्याचे घरगुती उपाय म्हणून देखील करू शकता, त्यासाठी तुम्हाला लवंग तेल आणि समप्रमाणात खोबरेल तेल एकत्रित करावे लागेल. आणि हे केलेलं मिश्रण तुम्ही अंगावर लाऊ शकता. हे लवंग तेल आणि खोबरेल तेलाचे मिश्रण अंगावर लावल्याने तुम्हाला डास चावणार नाहीत. हे तेल तुमच्या त्वचेला लावल्या नंतर साधारण ४ – ५ तास याचा असर राहील आणि तुम्हाला डास चावणार नाहीत.
लसूण – डास पळवण्यासाठी उपयुक्त
लसूण हे मानवी शरीरासाठी गुणकारी आहे. हार्ट अटॅक च्या पेशंट ला लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, ज्यांचा शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त आहे आशांनी लसूण नियमित खाल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. यांसारख्या अनेक गोष्टींसाठी लसूण उपयुक्त आहे. पण त्याच बरोबर डास मारण्याचे घरगुती उपाय जे तुम्ही करू इच्छिता त्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.
लसणाच्या वासाने डास तुमच्या पसून दूर जातील. लसणाचा वास हा उग्र असतो ज्यामुळे डास जवळ येत नाहीत. लसूण बारीक करून तो पाण्यात टाकून उकाळा आणि घरात ज्या ठिकाणी मच्छर असतील अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे तिथे लसणाचा उग्र वास जाईल आणि डास पळून जातील.
लिंबू व निलगिरी – डासांना दूर ठेवते
लिंबू व निलगिरी हे निरोगी शरीरासाठी उपयुक्त आहेतच, पण यांचा वापर देखील तुम्ही डास लांब ठेवण्यासाठी करू शकता. लिंबाचा रस व निलगिरीचे तेल समप्रमाणात मिसळा व हे मिश्रण शरीराच्या त्वचेवर लावा. यांचा वापर तुम्ही केल्यास मच्छर तुमच्या जवळ पण येणार नाहीत. आणि या मिश्रणाचे तुमच्या त्वचेला काही दुष्परिणाम देखील होणार नाहीत. डासांना दूर पळवण्यासाठी हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.
पुदिना
तुम्हाला जर पुदिण्याच्या वासाने काही त्रास होत नसेल तर तुम्ही पुदिण्याचा वापर डास मारण्याचा घरगुती उपाय म्हणून देखील वापर करू शकता. लवंग आणि निलगिरीच्या वासाने ज्याप्रमाणे डास लांब पळून जातात त्याच प्रमाणे पुदिण्याच्या वासाने देखील डास लांब जातात.
पुदिण्याचा रस करून तो पाण्यात मिसळून घरच्या जवळ देखील तुम्ही फवारू शकता. किंवा घराच्या जवळ दारात किंवा खिडकीत तुम्ही पुदिण्याचे रोपटे लाऊ शकता. पुदिण्याचा वासाने मच्छर घरात येणार नाहीत.
तुळस – डास मारण्याचा सोपा घरगुती उपाय
तुळस ही मच्छर घरात येण्यापासून रोकते, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. तुळस ही दरात किंवा घराच्या खिडकीत एखाद्या कुंडीत ठेवा. आयुर्वेदात तुळशीचे जे महत्व सांगितले आहे ते काही उगाच नाही. तुळस दारात किंवा खिडकीत असल्याने घरच्या आजूबाजूला डासांची उत्पती कमी होते आणि परिणामी घरात डास जास्त होत नाहीत.
झेंडू
झेंडू चे फूल जितके सुगंधित आणि आकर्षक असते त्याच प्रमाणे झेंडूचे झाड देखील. झेंडूचे झाड जर दारात किंवा घराच्या अंगणात असल्याने देखील घरात घरात डासांचे प्रमाण कमी होते. डास नियंत्रणा साठी झेंडू गुणकारी आहेच पण झेंडूचे झाड दारात असल्याने झेंडूच्या फुलाच्या सुगंधाने तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल.
गवती चहा
गवती चहा ची पाने चुरघळून चहात टाकल्याने ज्याप्रमाणे चहा उत्कृष्ट लागतो. त्याच प्रमाणे गवती चहा च्या पानांचा आर्क तुमचे डासांपासून संरक्षण करतो. गवती चहाचा अर्क तुम्ही अंगाला थोड्या प्रमाणात लावल्यास देखील डास तुमच्या अवती भवति येणार नाहीत.
ठराविक झाडे घराजवळ लावा
घराजवळ जास्त झाडे असल्याने घरात मच्छर होतात हा गैरसमज आहे. असे काही नसून तुळस, झेंडू, गवती चहा आणि पुदिना यांसारखी झाडे घराजवळ लावल्याने देखील डासांचे प्रमाण कमी होते. ही झाडे तुमच्या घरात डासांना येण्यापासून रोखतात. त्यामुळे घराच्या अंगणात ही झाडे नक्की लावा.
नारळ
वाळलेला नारळ ज्यावेळी आपण सोलतो, आणि त्याच्या वरील आवरण काढून फेकून देतो. ते फेकून न देता ते जाळावे आणि त्याचा धूर घरात करावा. हा उपाय देखील बरेच जण डास मारण्याचे घरगुती उपाय म्हणून करतात. याने प्रत्यक्ष्यात किती प्रमाणात डासांवर नियंत्रण मिळते हे शाश्वत जारी नसले तरी बहुतांश डासांपासून वैतागलेले लोक हा उपाय देखील करतात.
लॅवेंडर – रूम फ्रेशनर म्हणून वापरा
लॅवेंडर चा वापर घरात रूम फ्रेशनर म्हणून केल्यास तुमचा दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे त्याचा सुगंध तुम्हाला फ्रेशपणा तर देतोच आणि त्याच्या वासामुळे डास देखील दूर राहतात. लॅवेंडर चा वापर घरात करा हा डासांपासून वाचण्याचा उत्तम पर्याय होऊ शकतो.
डास मारण्याचे मशीन / डास मारण्याचे घरगुती उपकरण (आधुनिक उपकरण) / (Mosquito Killer Equipments)
डास मारण्याचे घरगुती उपाय आपण बघितले, आता आपण डास मारण्याचे आधुनिक आणि उपयुक्त असे उपकरण बघूयात. खाली काही उत्कृष्ट गुणवत्तेची उपकरणे दिलेली आहेत या कॅटेगरी मधील ही सर्वोत्तम उपकरणे असून ही टिकाऊ आहेत.
BigBuzz Electronic Eco-Friendly Mosquito Killer Lamps USB Powered
COROID International Eco Friendly Electronic LED Mosquito Killer Machine Trap Lamp
PYXBE Bug Zapper Mosquito Zapper & Indoor Bug Zapper LED Fly Trap Electronic Fly Zapper
iBELL Insect Killer Machine, OS221K, Bug Zapper Fly Catcher for Home, Restaurants, Hotels & Offices ₹ 1,390
MOSCLEAN UV LED Electric Insect Killer Violeds Mosquito and Insect Trap ₹ 2,500
सारांश – डास मारण्याचे घरगुती उपाय | डास नियंत्रण करण्यासाठी काही उपकरणे
लेखाच्या सुरवातीला डास मारण्याचे घरगुती उपाय दिलेले आहेत, हे उपाय घरच्या घरी करून आपण मच्छर / डासांपासून आपण आपल्या कुटुंबाचे, आपल्या लहान बाळाचे संरक्षण करू शकता. यांखेरीस आपल्याला जर आधुनिक उपकरण वापरुन घरातील डासांचा नायनाट करायचा असेल तर आपण दिलेल्या उत्कृष्ट ७ उपकरणांपैकी कोणतेही खरेदी करू शकता. आपल्याला खरेदी करावयाची असल्यास अथवा त्या उपकरणा विषयी अधिक माहिती हवी असल्यास “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व आपल्या काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)