नारळी पौर्णिमा माहिती मराठी / नारळी पौर्णिमा कोळी गीत / नारळी पौर्णिमा रक्षाबंधन (Narali Purnima Information In Marathi) >> नारळी पौर्णिमा हा सण विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव म्हणजे कोळी बांधव साजरा करत असतात. कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवाचाच येत असल्याने हा सण मोठया उत्साहाने कोळीवांडयामध्ये साजरा होत असतो.त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील इतर नद्यांच्या किनारी जो भुई समाज मासेमारी करतो तो समाज देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.
नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. महाराष्ट्रासह भारत देशाच्या इतर राज्यांमध्ये हा दिवस बहीण भावाच्या या पवित्र नात्याला उजळा देण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जातो.
अशा या श्रावण महिन्यातील महत्वाच्या सणा बद्दल माहिती या लेखामध्ये आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नारळी पौर्णिमा माहिती.
नारळी पौर्णिमा माहिती मराठी / नारळी पौर्णिमा कोळी गीत / नारळी पौर्णिमा रक्षाबंधन (Narali Pornima Information In Marathi)
सुरवातीला आपण नारळी पौर्णिमा सणा बद्दल माहिती जाणून घेऊयात त्यानंतर नारळी पौर्णिमेला कोळी व भुई बांधवांमध्ये गायले जाणारे कोळी गीत व गाणी आपण बघणार आहोत.
नारळी पौर्णिमा माहिती मराठी (Narali Pornima Information In Marathi)
श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव / भुई समाज नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र म्हणजेच वरुण देवता आहे असे समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे. त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कोळीबांधवाचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा रहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याची उतराई होण्याच्या हेतूने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.
नारळीपौर्णिमेच्या ब-याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवलेले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजनंनाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. याच कारणामुळे कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दरम्यान समुद्रात मासेमारी साठी जात नाहीत.
नारळीपौर्णिमा या सणाच्या दिवशी कोळी बांधव आपला पारंपारिक वेश परिधान करतात. कमरेला रूमाल अंगात टिशर्ट आणि डोक्याला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून अक्षरक्षः सोन्याने मढतात. कोळी कायम च सोन्याचे भरपुर दागिने आंगावर घालत असल्याने सामान्याना कायमच त्याचे अप्रुप वाटत आले आहे.
सागराची (दर्याची) पुजा
सगळे कोळी बांधव सांयकाळच्या वेळेला समुद्राची पुजा करावयास निघतात. नारळी पौर्णिमे निम्मित कोळी बांधवांच्या वतीने दर्याला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोनेरी कागदाचे वेषण गुंडाळले जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून सागराला साकडे घातलं जातं. कोळी बांधव आपापल्या बोटी रंगबेरंगी सजवितात, बोटींना पताका लावून सुशोभित केले जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरीता समुद्रात लोटतात.
कोळी स्त्रिया या दिवशी सागराला प्रार्थना करतात. समुद्रात माझा धनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर कोणतेही संकट नको देऊ नकोस. नारळीपौर्णिमे च्या निमित्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजाचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अशा रीतीने अगदी उत्साहात कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करतात.
नारळी पौर्णिमा कोळी गीत
सण आयलाय गो आयलाय गो
नारळी पुनवचा मनी आनंद मावणा
कोळयांचे दुनियेचा
अरे वेगीन वेगीन चला किनारी जाउ
देवांचे पुंजेला हा
सण आयलाय गो आयलाय गो
नारळी पुनवचा मनी आनंद मावणा
कोळयांचे दुनियेचा
नारळीपौर्णिमा गाणी
१)
वल्हव रे नखवा वल्हव वल्हव
दरियावरी आमुची डोले होरी
घेऊन माश्यांच्या ढोलीन आम्ही हाव जातीचे कोली
वादळ असो वारा नाही तो पावसाच्या धारा
तूफान दरिया लाटांचा मारा
ह्यो कोली नाही कोनाच्या धमकीस भिणारा
खंडू देवाचा लाऊन भंडारा
त्यावर भरोसा ठेऊन की सारा
वादळ वार्याशी गाठू किनारा
दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जिवावर आम्ही करताव मजा
नारलपुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाला
२)
गंगा जमुना दोघ्या
गंगा – जमुना दोघ्या बयनी गो पानी झुलझुल व्हाय
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाय- जुई – जाय
माश्यांनी मारलाय दणका गो पानी तलाला जाय
कोल्याची पोर एक सोबेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्यांनी जाय
अंगान चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
नाखवा गेलाय डौलीला पोरी करशील काय
अंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर नवरीचा बापुस कवट चोर
करवल्या खुइताना आंब्याच्या डांगल्या म्हायेरा जावाल सांजवलं
आंब्याची डांगली हलीवली नवर्याने नवरीला पलविली.
सारांश – नारळी पौर्णिमा माहिती मराठी
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला एकाच दिवशी दोन सण म्हणजेच नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन/ राखीपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रातील समुद्र किनार्या लगतचे कोळी बांधव व काही मोठ्या नद्यांच्या किनार्यावरील भुई बांधव नारळी पौर्णिमेला अनुक्रमे समुद्राची व नदीची पुजा केली जाते. या बाबतची नारळी पौर्णिमेची सर्व माहिती वरील लेखामध्ये दिलेली आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android apps Baby Products best Free Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products Rainy Season udyojak अभ्यास संबंधित अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण ट्रक देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल योजना रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती सण स्पीकर स्वयंपाक हिंदू