नागपंचमी माहिती मराठीत / नागपंचमी विषयी संपुर्ण माहिती

waterdensor diya premium

नागपंचमी विषयी माहिती / नागपंचमी ची माहिती / नागपंचमी पूजा कशी करावी/ नागपंचमी कथा मराठी (Nagpanchami Mahiti In Marathi) >> हिंदू धर्मातील पवित्र्याचा महिना म्हणजे श्रावण महिना. हिंदू कॅलेंडर नुसार सर्वात जास्त सण असणारा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या महिन्याच्या सुरवातीलाच येणारा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीचा हा सण संपूर्ण भारत भर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नाग देवताची पुजा करण्याची प्रथा आहे. महिला भक्ति भावाने या दिवशी वारुळा ला जाऊन नाग देवताची पुजा करतात.

हिंदू देवतांमध्ये शंकर भगवानांच्या गळ्याभोवती नाग असतो,तर भगवान विष्णु तर शेष नागावर विराजमान आहेत आणि गणपतींच्या तर कंबरेला नाग असतो. त्यामुळे नाग देवतेला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

या वर्षी म्हणजेच २०२४ साली नागपंचमी ९ ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे.

नागपंचमी माहिती मराठीत (Nag Panchami Mahiti in Marathi)- नागपंचमी पूजा कशी करावी -नागपंचमी कथा मराठी

नागाची उत्पत्ति कशी झाली तर वेद काळापासून प्रचलित असणार्‍या कथांवरून असे दिसते की, नाग हे कश्यप आणि कद्रू नामक नवरा बायकोचे आठ नाग पुत्र होते. आणि हे लोकांना खूप त्रास देत असत त्यावरून ब्राह्मण देव त्यांना शाप देतात की तुम्ही तुमच्या सावत्र भाऊ असलेल्या गरुडाकडून मारताल. तेंव्हा पासून गरुड हे सापाला खातात.

श्रावण महिन्या मध्ये साधारण पणे शुल्क पक्ष्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी येते. या लेखामध्ये आपण नागपंचमी विषयी माहिती बघणार आहोत. जसे की नागपंचमी ची पूजा कशी करावी नागपंचमी कथा मराठी व नागपंचमी ची आरती.

चला तर मग जाणून घेऊयात नागपंचमी माहिती मराठीत.

नागपंचमी ची पूजा कशी करावी / नागपंचमी कशी साजरी करतात (Nag Panchami Puja Mahiti in Marathi) – नागपंचमी माहिती

  • नागपंचमी माहिती मराठीत बघताना सुरवातीला आपल्याला नागपंचमी ची पुजा कशी केली जाते हे माहिती असणे गरजेचे आहे. तर श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्व आहे. साप हा शेतकर्‍यांचा मित्र असे म्हंटले जाते कारण सापांमुळे शेतातील उंदरांची संख्या आटोक्यात राहते. उंदरांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत असते आणि साप उंदराणा खातात त्यामुळे शेतकर्‍याचे होणारे नुकसान टळते. त्यामुळे नागपंचमी या दिवशी नागा बद्दल चांगली भावना समाजात रुजवण्या साठी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवतेला पूजले जाते.
  • नागपंचमी माहिती सांगताना हे नमूद करावे वाटते की, तसे पाहायला गेलेतर नागपंचमी हा सण फार पूर्वीपासून म्हणजेच वेद काळापासून साजरा केला जात आहे. या दिवशी महिला नवीन वस्त्र व दागिने परिधान करून नाग देवतेची पुजा करतात. महाराष्ट्रमध्ये विशेषतः ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नाग देवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. वारुळा जवळ जाऊन नाग देवतेला लाहया,दूध,साखर व पुरणापासून बनवलेल्या उकडीची दिंड वारुळा जवळ ठेवून पूजा केली जाते.
नागपंचमी माहिती मराठीत (Nag Panchami Mahiti in Marathi)- नागपंचमी पूजा कशी करावी -नागपंचमी कथा मराठी
  • महाराष्ट्रातील शहरी भागात व महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर काही राज्यांमध्ये नाग पंचमीची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे.शहरी भागात स्रीयांना वारुळाला जाणे शक्य नसल्या कारणाने,त्या या दिवशी पारंपारिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद व चंदंनाचा वापर करून नाग – नगिन व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढतात व त्यांना दूध,लाहया,पुरणापासून बनवलेल्या उकडीची दिंड,दुर्वा,आघाडा व साखर वाहून त्याची पूजा करतात.
नागपंचमी माहिती मराठीत (Nag Panchami Mahiti in Marathi)- नागपंचमी खेळ
नागपंचमी माहिती मराठीत – नागपंचमी खेळ
नागपंचमी माहिती मराठीत (Nag Panchami Mahiti in Marathi)- नागपंचमी खेळ
नागपंचमी माहिती (Nag Panchami Mahiti in Marathi) -नागपंचमी खेळ
  • तसेच या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाहीत. जुने लोक असे म्हणतात की नागपंचमी च्या दिवशी काहीही कापू नये, तळू नये व चुलीवर तवा ठेवू नये वगैरे. तर नवीन लग्न झालेल्या नववधू आपल्या माहेरी येतात आणि मग तिथे फुगडी, झिम्मा, झाडाला झोके बांधून खेळणे हे खेळ रंगतात. यांसारखे खेळ हे नववधू व तरुण मुलींना या सणाचे विशेष आकर्षण निर्माण करतात. तर तरुण मुले या सणाला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. यांसारखे खेळ खेळून तरुण तरुणी हा सण आनंदाने साजरा करतात.
Nag Panchami Mahiti in Marathi-  खेळ
Nag Panchami Mahiti in Marathi-नागपंचमी खेळ
  • नागपंचमीच्या एक दिवस आधी स्रीया आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे व त्याला सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ति मिळावी म्हणून उपवास करतात. भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे या नागपंचमी सणाचे वेगळेपण आहे.
waterdensor diya premium

नागपंचमी कथा मराठी (Nagpanchami Katha In Marathi) – नागपंचमी माहिती

नागपंचमीच्या अनेक कथा आहेत त्यातील चार लोकप्रिय कथा आम्ही या नागपंचमी माहिती लेखाच्या माध्यमातून देत आहोत.

  • पहिली नागपंचमी कथा मराठी (Nag Panchami Katha in Marathi) नागपंचमीच्या एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास उपवास धरते, त्याची एक प्रचलित कथा आहे ती पुढीलप्रमाणे, एक देवी होती जिचे नाव सत्येश्वरी, तिला एक भाऊ होता त्याचे नाव सत्येश्वर होते. सत्येश्वर चा मृत्यू नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला,आणि त्याच्या मृत्युच्या दुःखात अखंड बुडालेला सत्तेश्वरीने अन्न पाणी सोडले व तो पूर्ण दिवस अन्नाचा एक कन ही घेतला नाही. त्यानंतर सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसतो,आणि ती त्याला आपला भाऊ मानते. तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेने वचन दिले की जी बहीण नागपंचमीच्या अधल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करेल आणि नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पुजा करेल तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेल. तेंव्हा पासून नागाची पुजा करून प्रत्येक स्री नागपंचमी साजरी करते.
  • दुसरी नागपंचमी कथा मराठी (Nag Panchami Katha in Marathi)  एक परीक्षित नामक राजा होता, एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो. तिथे जंगलात शिकरीच्या शोधात असताना तो तहाणेने व्याकुळ होतो,तेंव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो,पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहचतो. त्यावेळी तिथे आस्तिक नामक तेजस्वी ऋषि तपश्‍चर्या करीत असतात,त्यांना पाहून तहाणेने व्याकुळ झालेला राजा त्यांना पाणी माघतो. परंतु आस्तिक ऋषि राजाकडे दुर्लक्ष करतात. राजा त्यांना पुन्हा पाण्याची मागणी करतो परंतु ऋषि आपल्या तपश्‍चर्या मध्ये मग्न असतात. राज्याला या गोष्टीचा राग येतो,आपण एवढे पंचक्रोशीचे राजे आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषि दुर्लक्ष करतो हे काही राज्याला सहन झाले नाही. रागावलेल्या राजा आस्तिक ऋषींच्या गळ्यात मेलला साप टाकतो.हा झालेला सर्व प्रकार आस्तिक ऋषींचा मुलगा पाहत असतो,राज्याने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राग येतो. तो आस्तिक ऋषींचा पुत्र राज्याला शाप देतो की आज पासून बरोबर सातव्या दिवशी दक्षक नामक सर्पा कडून तुला दंश होईल आणि त्याने तुझा मृत्यू होईल. “Nag Panchami Mahiti in Marathi”

आस्तिक ऋषींच्या पुत्राच्या या शापाने राजा प्रचंड भयभीत होतो,आणि राजवाड्यात आल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगितली. राजाचा मुलगा आपल्या वडिलांना या शापा पासून वाचवण्यासाठी एक यज्ञ करतो. या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग येऊन स्वतःला झोकून देऊ लागले. या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग आस्तिक ऋषींकडे मदत मागायला गेले. त्यांची अवस्था पाहून आस्तिक ऋषी राज्याच्या मुलाकडे आले आणि त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि राजाला का शाप दिला ते सांगितले.हे सर्व ऐकल्या नंतर राजपुत्राने ऋषींची क्षमा मागितली व राज्याने देखील ऋषींची क्षमा मागितली. आणि तेंव्हा पासून राजपुत्र नाग देवतांची पुजा करू लागले. ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेंव्हा पासून नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाऊ लागली.

  • तिसरी नागपंचमी कथा मराठी (Nag Panchami Katha in Marathi) एक आटपाट नगर होते,तिथे एक ब्राह्मण राहत होता, त्याला पाच सुना होत्या. श्रावणातील नागपंचमीचा सण आला, सर्व सुना आपल्या आपल्या माहेरी नागपंचमीचा सण साजरा करायला गेल्या, पण त्यातील एक सून अशी होती जिला माहेरचे कोणीच नव्हते,त्यामुळे ती सासरीच राहिली. ती उदास होऊन बसली होती, तेंव्हाच तिच्या मनात आले,या सणाला माहेरहून मला नेहायला नागोबा देवच येतील असे विचार करत असतानाच ती नागोबा देव मला नेहायला येतील असे म्हणू लागली. तिचे हे बडबडणे ऐकून शेष भगवानास तिची दया आली,त्यांनी ब्राहमनाचे रूप घेतले व त्या सुनेला नेण्यासाठी आले. त्या ब्राह्मण रूपात आलेल्या शेष नागाला पाहून ब्राह्मण सासरा अचंबित झाला, त्याला प्रश्न पडला या सुनेचे तर कोणी नातलग नाहीत आणि असतील तर हा इतके दिवस कुठे होता आताच कुठून आला. ह्या विचाराने त्याने मुलीला विचारले की हा ब्राह्मण मनुष्य तुझा कोण आहे,त्यावर ती मुलगी उत्तरली हा माझा मामा आहे. हे ऐकल्यावर ब्राह्मण सासर्‍याने देखील तिची रवानगी केली.

ब्राह्मण रुपधारी शेष नाग देवता तिला घेऊन वारुळात गेले,तिला आपल्या फण्यावर बसवले व आपल्या बायका मुलांना देखील तिला त्रास न देण्याचे सांगितले. थोडे दिवस आनंदाने घालवल्या वर शेष नागदेवता परत ब्राह्मण वेष धारण करून तिला तिच्या सासरी सोडून आले. तिची नागपंचमी आनंदात गेली,आणि त्याचीच आठवण म्हणून दर वर्षी ती सून अगदी भक्ति भावाने नागपंचमीला नाग देवतेची पूजा करू लागली.

  • चौथी नागपंचमी ची कथा ही भगवान श्री कृष्ण यांच्या वर आहे ते जेंव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर येतात. त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

सारांश- नागपंचमी माहिती मराठी

नागपंचमी चा सण कसा साजरा केला जातो तसेच नागपंचमीच्या प्रचलित कथा ही सर्व नागपंचमी माहिती मराठीत आपण बघितली. या मध्ये काही त्रुटि असतील किंवा तुमचा काही सल्ला असेल तर आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.

या वर्षी नागपंचमी कधी आहे ?

या वर्षी म्हणजेच २०२४ साली नागपंचमी ०९ ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे.

नागपंचमी कशी साजरी करतात ?

ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नाग देवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. वारुळा जवळ जाऊन नाग देवतेला लाहया,दूध,साखर व पुरणापासून बनवलेल्या उकडीची दिंड वारुळा जवळ ठेवून पूजा केली जाते. तर शहरी भागात स्रीयांना वारुळाला जाणे शक्य नसल्या कारणाने,त्या या दिवशी पारंपारिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद व चंदंनाचा वापर करून नाग – नगिन व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढतात व त्यांना दूध,लाहया,पुरणापासून बनवलेल्या उकडीची दिंड,दुर्वा,आघाडा व साखर वाहून त्याची पूजा करतात.
तसेच नवीन लग्न झालेल्या नववधू नागपंचमी सणाला आपल्या माहेरी येतात आणि मग तिथे फुगडी, झिम्मा, झाडाला झोके बांधून खेळणे हे खेळ रंगतात. यांसारखे खेळ हे नववधू व तरुण मुलींना या सणाचे विशेष आकर्षण निर्माण करतात. तर तरुण मुले या सणाला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. यांसारखे खेळ खेळून तरुण तरुणी हा सण आनंदाने साजरा करतात.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “नागपंचमी माहिती मराठीत / नागपंचमी विषयी संपुर्ण माहिती”

Comments are closed.

Scroll to Top