महाराष्ट्र बचाव आंदोलन हे तर फडणवीसांचे डिप्रेशन.

waterdensor diya premium

महाराष्ट्र बचाव आंदोलन>> आज कोरोना विषाणू च्या या महामारीचा सामना करताना जो तो आपल्या परीने प्रयत्न करत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा शर्थीची पराकाष्टा केलेली असताना.गेल्या जवळपास 3 महिन्यां पासून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात गुंतलेला दिसतोय.

महाराष्ट्र बचाव आंदोलन आणि फडणवीसांचे डिप्रेशन

आज जग भरात हजारो जीव धोक्यात असताना संपूर्ण जग या संकटाशी एकजुटीने लढत असताना महाराष्ट्रात मात्र विरोधक कुरघोड्या करण्यात व्यस्त दिसत आहेत.मुंबई मधील वांद्रे येथील जो जमाव गोळा झाला ते प्रकरण असूद्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीची निवडणूक असुद्या.किंवा मग आता फडणवीस यांनी चालू केलेलं हे महाराष्ट्र बचाव आंदोलन असुद्या.

या ३ महिन्यांच्या कालावधी मध्ये फडणवीस हे राज्य सरकार ताब्यात घेण्याची नुसती संधी शोधत आहेत.मग ते सारखे राज्यपालांच्या भेटीला जाणे असो किंवा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे असो.पण फडणवीस यांची डाळ कुठेच शिजत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता हे महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे.अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे.

फडणवीस आणि त्यांच्या फॉलोवर्सच्या कृती

फडणवीस आणि त्यांच्या फॉलोवर्स च्या सोशल मीडिया वरील प्रतिक्रिया या बऱ्याच बोलक्या आहेत.म्हणजे ज्या दिवशी महाविकास आघाडी मध्ये विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्या वरून चर्चा सुरू होत्या.काँग्रेस सुद्धा 2 जागा लढायचे म्हणत होते त्यावेळी फडणवीसांचे फॉल्लोवर/कार्यकर्ते यांना मात्र फडणवीस हे १००% पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटू लागले आणि त्यांनी तश्या पोस्ट देखील केल्या.फडणवीस तर जणू अजून देखील मुख्यमंत्रीच आहेत ह्या अविर्भावात वावरत आहेत अश्या चर्चा लोक करत आहेत.

waterdensor diya premium

महाराष्ट्र बचाव आंदोलन
६ मे २०२० ची पोस्ट

महाराष्ट्र बचाव आंदोलन
ही देखील ६ मे २०२० ची पोस्ट

मोदींनी आत्मनिर्भर भारत ची घोषणा केली आणि त्यानंतर 2 दिवसात फडणवीस यांच्या ट्विटर हँडल वरून जवळ जवळ आत्मनिर्भरतेच्या ३०-३५ पोस्ट ह्या वेगवेगळ्या डिजाईन मधून पडल्या होत्या.वारकरी संप्रदायाला फडणवीस अश्या कोरोनाच्या परिस्तिथीत देखील आपण वारीची परंपरा खंडित न करता वारी काढली पाहिजे अश्या पद्धतीने आश्वासित करताना दिसत असल्या मुळे आता मात्र फडणवीस हे काहीही करत असल्याच्या भावना जनतेमध्ये होत आहेत.

फडणवीस यांची कृती आणि देहबोलीच आता सांगू लागली आहे की राज्य सरकारच्या उत्तम कामगिरी मुळे ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत आणि काहीही आरोप करत सुटले आहेत.

या उलट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र सर्वाना विश्वासात घेऊन सांगत आहेत काळजी करू नका आम्ही हा महाराष्ट्र कोरोनाच्या या संकटातून निश्चित बाहेर काढू आपल्याला मी आवडत असेल किंवा नसेल अश्या पद्धतीचा वाक्यप्रचार ठाकरे यांच्या बोलण्यातून येत असल्या मुळे ते विरोधकांना देखील अश्या या कठीण प्रसंगी सामावून घेण्याची भाषा करताना दिसतात.

आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (मामु) मात्र या कोरोना विषाणू च्या भीषण परिस्तिथीत देखील वारकरी संप्रदायला आव्हान करून म्हणा किंवा महाराष्ट्र बचाव आंदोलन करून म्हणा महाराष्ट्राला वेठीस धरताना दिसत आहेत.हे सर्व मुख्यमंत्री पद गेल्याचं डिप्रेशन च म्हणावे नाहीतर काय. अश्या चर्चा आता लोक सर्रास पने करताना दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top