KBC (कौन बनेगा करोडपती) हा शो परत एकदा चालू होतोय. केबीसीच्या या १२ व्या हंगामा साठी या शो चे होस्ट अमिताभ बच्चन २२ मे पर्यंत दररोज रात्री एक नवीन प्रश्न विचारतील.
स्वत: ची नोंदणी करण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांना एसएमएस किंवा Sony Live अॅप च्या माध्यमातून या प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यायची आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. आणि शोसाठी रजिस्टर ९ मे रोजी रात्री ९ वाजता सुरू झाली आहे.
९ मे रात्री ९ वाजता अमिताभ यांनी सोनी टीव्ही वर या हंगामाचा पहिला प्रश्न विचारला. आता २२ मे पर्यंत दररोज रात्री, अमिताभ बच्चन एक नवीन प्रश्न विचारतील.
केबीसीच्या या हंगामसाठी नोंदणी करण्यास इच्छुक असणार्यांना या प्रश्नांची उत्तरे SMS किंवा Sony Live या App मधून द्यावी लागतील.
SMS द्वारे Registration
- तुमच्या कडे जर जिओ फोन व्यतिरिक्त दूसरा कोणता फोन असेल तर मेसेज पाठविण्यासाठी ३ रूपये शुल्क आकारले जाईल.
- ५०९०९३ या नंबर वर एसएमएस पाठवा.
- SMS चे स्वरूप हे असे असावे:- KBC, Option A, B, C or D, Age, Gender.
- उदाहरणार्थ, जर आपले उत्तर पर्याय C असेल आणि आपण 35 वर्षांचे आहात आणि आपण पुरुष आहात, तर आपल्याला लिहावे लागेल KBC C 35 M
KBC Registration -Sony Live App द्वारे
- Sony Live हे App आपल्या मोबाइल मध्ये उघडा.
- KBC च्या लिंक वर क्लिक करा
- Registration च्या प्रश्नाचे उत्तर द्या
- यानंतर आपल्याला दिसत असलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती तपशीलवार भरा
- भरलेली माहिती Submit करा.
- हे सगळे क्रमवार केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर “Thanks for Completing KBC Registration” असा संदेश दर्शविला जाईल.
भारता सह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातलेले असताना हा शो होईल का नाही या बाबत शंका व्यक्त केली जात होती. याच दरम्यान Sony TV ने ही घोषणा केली आहे.
कोरोनाच्या धोका टाळण्यासाठी या वर्षी KBC च्या १२ व्या हंगामासाठी ची संपूर्ण निवड प्रक्रिया ही ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रम सोनीवर २००० सालापासून सुरू आहे.
आतापर्यंत के.बी.सी.चे ११ हंगाम झालेले असून या वर्षी म्हणजे २०२० मध्ये १२ व्या हंगामासाठी Registration सुरू झाले आहे.
आता पर्यन्त च्या इतिहासात अमिताभ बच्चन यांनीच या शो चे होस्टिंग केलेलं आहे फक्त एकदा शाहरुख खान याने शो चे होस्टिंग केले होते.
या वर्षी KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य ज्ञान परीक्षा आणि व्हिडिओ सबमिशन Sony Live App च्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
Online ऑडिशन पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक मुलाखती या व्हिडिओ कॉलद्वारे घेण्यात येतील.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Pingback: Ramayana has not made a world record. The record of this serial... - Bihar Se Hai