जिओ फायबर (Jio Fiber) सेवा ५ सप्टेंबर २०१९ पासून चालू होणार.
रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries) ने रविवारी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. मुंबई च्या बिर्ला मातोश्री सभागृह मध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमा मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे चेअरमेन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा देशाच्या नागरिका न साठी ऐतेहासिक घोषणा केली की ५ सप्टेंबर ला म्हणजेच जिओ (Jio) लॉंच केलेल्या ३ वर्ष पूर्ति च्या मुहूर्ता वर जिओ कंपनी च्या तर्फे देशभरात जिओ फायबर च्या सेवा लॉंच करण्यात येतील.
मुकेश अंबंनींनी त्यांच्या भाषणात सांगितले ,आमचे लक्ष्य 24 लाख लहान व मध्यम व्यापारानं मध्ये मजबूती आणणे आहे. ह्याला सरळ आणि सोप्या प्लान सोबत लॉंच करण्यात येईल.
तसेच जिओ ने येणार्या काळात कमीतकमी २० कोटी कुटुंबां पर्यन्त ही सेवा पोहचवण्या चे उदिष्ट ठेवलेले असून, त्यासाठी जवळपास १५००० इंजीनियर ची गरज आहे.जिओ गिगा फायबर बाजारात येण्या आधीच,म्हणजे आतापर्यंत जवळपास १६ कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे.
अबब……एवढं Internet स्पीड .
जिओ फायबर चे दर ७०० रुपये पासून १०००० रुपये प्रतिमाह पर्यंत असतील.जिओ फायबर चे प्लान १००एमबी प्रति सेकंड (Mbps) पासून सुरू होऊन १जीबी प्रति सेकंड (Gbps) पर्यंत जातील.
अमेरिकेत सरासरी इंटरनेट चा स्पीड ९० एमबी प्रती सेकंड आहे पण आता जिओ फायबर (Jio Fiber) मध्ये मिनिमम प्लान चा स्पीड हा १०० एमबी प्रती सेकंड (Mbps) असेल.
ह्या प्लान मधला मिनिमम म्हणजेच १०० एमबीपीएस (mbps) चा जरी आपण प्लान घेतला तरी आपल्याला आता च्या कोणत्याही नेटवर्क च्या इंटरनेट स्पीड च्या तुलनेत जवळपास १०० पटीने अधिक प्रमाणात फास्ट इंटरनेट स्पीड मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही तुमची पापणी लवते न लवते तोच एखादा High Defination (HD) video डाऊनलोड करू शकता.
जिओ फायबर चे फायदे (Benefits of jio Gigafiber) :-
- जिओ फायबर निवडणार्या ग्राहकाला जिओ देणार 4K TV आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत दिला जाणार आहे. तसेच त्याचावर दुनिया भरातील नामांकित कंपन्यांच्या गेम देखील असतील.
- घर बसल्या आता तुम्ही तुमच्या नातेवाइकान सोबत लाईव विडियो कॉल करून मनसोक्त गप्पा मारू शकणार आहात.
- सोबत प्रिमियम ओटीटी अॅप्लिकेशन पण देण्यात येणार आहेत.
- तसेच मुकेश अंबानी नी घोषणा केली की जिओ फायबर सोबत एक लॅंडलाइन कनेक्शन पण देण्यात येईल, ज्याच्यावरून देशभरात कोणत्याही नेटवर्क वर मोबाइल किंवा लॅंडलाइन वर वॉइस कॉल आजीवण मोफत असतील.
- २०२० च्या मध्या पर्यंत प्रिमियम ग्राहक आपल्या घरी बसून कोणतीही फिल्म त्याच्या रीलीज च्या दिवशी बघू शकतात,त्याला जिओ ने ‘ जिओ फर्स्ट डे फर्स्ट शो ’ चे नाव दिले आहे.
- अमेरिका किंवा कॅनडा मध्ये अनलिमिटेड कॉलिंग पॅक फक्त ५०० रुपये प्रति महिना असेल, तसेच इतर देशांमध्ये कॉलिंग चे दर हे सध्याच्या दरांपेक्ष्या कमी म्हणजे १/५ ते १/१० प्रमाणात दर कमी होतील.
जिओ फायबरची नोंदणी ( Registration )
नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, नोंदणी साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
https://gigafiber.jio.com/registration
एकंदरीत पहाता रिलायन्स जिओ च्या या फायबर मुळे पुन्हा एकदा देशभरात इंटरनेट चा वापर हा वाढणार हे नक्की.
जिओ फायबरची किंमत ( Jio Fiber price )
किंमत किती असेल या बाबत मुकेश अंबंनींनी काहीही भाकीत केलेले नाही परंतु अंदाजे ४५०० रुपये पर्यन्त जिओ फायबर चे पूर्ण इंस्टॉलेशन करून मिळेल असा अंदाज शेअर होल्डर कडून वर्तवला जात आहे.
तसेच लघु उध्योग धारकांना ब्रॉडब्रॅंड इंस्टॉलेशन १५०० रुपये मध्ये करून दिले जाईल.
ईतर डीटेल माहिती साठी आपल्याला ५ सप्टेंबर पर्यन्त थांबावे लागणार हे मात्र नक्की .
आपल्याला ही माहिती आवडली असल्यास खाली दिलेल्या बॉक्स मध्ये कमेन्ट करायला विसरू नका. तसेच जिओ फायबर बद्दल अधिक माहिती साथी कमेन्ट करा. धन्यवाद !
Make sure you also check our amazing article on Vivo Z1 Pro Review
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)