व्यायामाचे महत्व | व्यायामाचे जीवनातील महत्व मराठी निबंध | व्यायाम न केल्याचे परिणाम |आहार व मानसिक स्वास्थ संपूर्ण माहिती | Exercise Importance in marathi >> आजच्या जगामध्ये आरोग्य सर्वांना हवी आहे पण त्याचे मोल कोणाला द्यायची नाही आरोग्यही वाटत सापडणारी गोष्ट नाहीये किंवा कोणी देणगी देऊ शकेल अशी गोष्ट नाहीये. चांगले आरोग्य पाहिजे असल्यास व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आजच्या युगामध्ये तीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येण्याच्या घटना ऐकून मन सुन्न होऊन जाते आणि वाटतं माणसाने इतकी सारी प्रगती केली पण त्याच्या वर आज त्याचा आळस भारी पडलेला दिसतो.
व्यायामाचे महत्व मराठी निबंध
विविध समाज सुधारक आणि विविध विचारवंतांनी आपल्या विचारातून समाजाला व्यायामाचे जीवनातील महत्त्व पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. आपल्या विचारांमध्ये व्यायामाचे महत्व पटवून देत त्यांनी सांगितले आहे की आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, व व्यायाम हा तुमचे संरक्षण करणारा व तुमच्या आयुष्य वाढवणारा मित्र आहे.
व्यायामाचे जीवनातील महत्व – व्यायाम न केल्याचे परिणाम
मानवाच्या जीवनामध्ये शरीर प्रकृती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे त्या शरीराला निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये आपणास मोठ्या पदावरील व धनवान व्यक्ती आढळून येतील त्यांच्याकडे सर्वकाही असताना पण त्यांच्या चेहऱ्यावर सुखद भावना किंवा चांगल्या प्रकारची शरीर संपत्ती नाही. तुम्ही पैशाने सर्व काही घेऊ शकता, पण आपले शरीर प्रकृती व शरीर व्यवस्थित करू शकत नाहीत. तर त्याच्या उलट समाजामध्ये तुम्हाला काही अशा व्यक्ती दिसतील ज्यांच्याकडं अत्यंत गरिबी व बिकट अवस्था आढळून येईल, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व निरोगी सुदृढ शरीर असेल. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या कामातून त्यांच्या शरीराचा होणारा व्यायाम हे आहे. या दोन उदाहरणावरून आपल्याला समजून घेण्यास मदत होईल की व्यायामाचे महत्त्व किती आहे.
मानवाने चांगले आयुष्य जगण्याच्या दिशेने दिवसेनदिवस पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यापेक्षा माणूस सुखी झाला आहे, चांगले आयुष्य जगत आहे पण दिवसेंदिवस वाढत चालले आहे ते मानवाचे रोगी शरीर, वाढते हॉस्पिटलचे बिल,नवीन नवीन प्रकारचे रोग हे सर्व मानवाच्या आळशीपणामुळे व निरोगी शरीर न ठेवल्यामुळे झालेले परिणाम आहेत.
व्यायामाचे जीवनातील महत्व – आहार व मानसिक स्वास्थ यांवर व्यायामाचे परिणाम
मानवाच्या आहारा मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तो आहार पचण्याच्या दृष्टीने मानव व्यायाम करत नाही आहे व त्यामुळे शरीरातील फॅट वाढते, आणि हीच शरीरातील फॅट रोगांना निमंत्रण देत आहे. व्यायामाच्या मार्फत फॅट कमी करून मानवास चांगली शरीर प्रकृती लागू शकते. व्यायामाचे जीवनातील महत्त्व मानव निर्मितीच्या काही शतकापासून विविध विचार विचारवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यायाम केल्याने शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा मानवामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळून येतो असे काही संशोधनाच्या माध्यमातून समोर आले आहे. माणसांमध्ये व्यायामाच्या मार्फत एक ऊर्जा निर्माण होऊन त्याच्यामध्ये सकारात्मक विचारांची भर पडते व त्याचा स्वतःवरील विश्वास वाढण्यास मदत होते. काही लोकांनी आपल्या यशामध्ये नियमित व्यायाम केल्यामुळे सुद्धा मदत झाली आहे, यावरून आपण समजू शकता की व्यायामाचे महत्त्व शारीरिकदृष्ट्या बरोबरच मानसिकदृष्ट्या पण मोठे आहे.
व्यायामाचे वेगवेगळे स्वरूप
विविध संस्कृतीमध्ये विविध प्रकारे व्यायाम करण्यात येतो आणि त्यानुसार त्यांना विविध अशी नावे देण्यात आलेली आहेत, जसे की उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये योगा मार्फत व्यायामाचा सल्ला दिला जातो. सध्य स्थितीत भारताचे असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपली संस्कृती आणि एक चांगला व्यायामाचा विकल्प म्हणून जगासमोर योग हा एक प्रकार मांडला आहे. मानवाच्या विकासामध्ये व चांगल्या समाज निर्मितीच्या दृष्टीने व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण बहुतांश वेळा सिनेमा गृह, हॉटेल, हॉस्पिटल हे रस्त्याच्या कडेला व मोक्याच्या जागेवर दिसतात, पण व्यायामगृह कधी तशा प्रकारच्या जागेवर दिसत नाहीत खरंतर या गोष्टीची कीव वाटते.
व्यायामाचे जीवनातील महत्व सांगणारी गोष्ट
व्यायामाचे जीवनातील महत्व पटवून सांगताना मला एक कथा आठवली त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की एक विद्वान व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळेस शरीर प्रकृतीने साथ न दिल्यामुळे परीक्षेपासून दूर राहिला, व समाजाला आपले चांगले ज्ञान देण्याच्या बदल्यात शरीरप्रकृती ने साथ न दिल्यामुळे त्याचे आयुष्य अत्यंत कमी कालावधीतच संपुष्टात आले. कथाकाराने यातून असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कितीही विद्वान व्यक्ती असो किंवा कितीही धनसंपन्न असो त्याची शरीर प्रकृती त्याला साथ देत नसेल तर त्या ज्ञानाचा आणि धनसंपत्तीचा काही अर्थ उरत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विविध ओळी च्या माध्यमातून व्यायामाचे महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या काही अत्यंत सुंदर ओळी खालील प्रमाणे आहेत
|| व्यायाम आरोग्यदायी मित्र ध्यानी ठेवावे हे सूत्र ||
तात्पर्य
दिवसेंदिवस ढासळत चाललेली समाजामधील लोकांची प्रकृती व वाढते शारीरिक रोग या सर्व समस्यांवर उपाय म्हणून व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यायामाचे जीवनातील महत्त्व समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणे समाजाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे व यावर विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे व ती त्या व्यक्तीच्या हातात आहे, की ती कशाप्रकारे आपल्या आयुष्यात अंमलात आणायची हे ज्याचे त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)