काल 1मे महाराष्ट्र दिन होता आणि याच दिवशी केंद्रातील मोदी सरकार ने 1 अनाकलनिय निर्णय घेतला आहे. IFSC अर्थात आंतर राष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र जे आता मुंबई मध्ये स्थायिक आहे ते गुजरातला हलवण्याचा निर्णय काल मोदी सरकारने घेतला.
हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायकारक आसल्याची भावना महाराष्ट्रातील जनमानसात व्यक्त होत आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी मात्र हा निर्णय योग्य आहे ह्या आशयचे ट्वीट केले आहे .
हा स्थलांतरचा निर्णय नसून एका ठिकाणी सर्व सुविधा देण्यासाठी एक IFSC ची संस्था गुजरात मध्ये ही सुरू करायची आहे असे फडणवीस यांनी या निमित्ताने संगितले आहे.
दरम्यान मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून देखील IFSC ही संस्था मुंबई मधून गुजरातच्या गांधी नगर येथील गिफ्ट सिटि मध्ये हलवणे म्हणजे “मुंबई चे आर्थिक राजधानी म्हणून असलेले महत्व कमी करण्याचा भाजप चा डाव आहे” अशी टीका विरोधी पक्ष करत असतानाच, फडणवीस यांनी मात्र हा निर्णय योग्य असल्याचे सांगितल्या मुळे हे प्रकरण आणखीन पेटण्याची चिन्ह दिसत आहेत .
IFSC गुजरात च्या गिफ्ट सिटि मध्ये स्थलांतरित करण्याचा मोदी सरकारचा त्या निर्णयाच्या समर्थनार्थ फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. आणि हा निर्णय होऊ नये म्हणून आम्ही आमचे सरकार असताना काय काय प्रयत्न केले,IFSC च्या एकाच ठिकाणी सर्व सुविधा देण्या साठीचा अहवाल 2007 मधेच सादर झाला होता,पण त्यावर अजून पर्यन्त निर्णय झाला नव्हता. हे सांगतानाच त्यांनी आताचे सरकार काय काम करत नाहीये या आशयाचा विडियो आपल्या ट्वीटर हॅंडल वर पोस्ट केला आहे.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 2, 2020
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये अहवाल सादर केला. #IFSC pic.twitter.com/uzT0jhEmGq
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Nagpur madhe yeu shakat asat saheb
Phadanvis he Modinche mandlik ahet tyamule tyana hujaregiri karavich lagate