वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / जाड होण्यासाठी काय करावे, काय खावे

waterdensor diya premium

वजन वाढवण्यासाठी उपाय / वजन वाढवण्यासाठी काय करावे/ जाड होण्यासाठी उपाय/ तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय >> आजच्या काळात वजन वाढणे खूप सर्वसाधारण समस्या आहे, परंतु काही लोकांच्या बाबतीत आपल्याला याच्या उलट पाहावयास ‍मिळते म्हणजे वजन वाढतच नाही किंवा शरीरांची पाहिजे तेवढी सर्वांगिन वाढ होत नाही. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. किती ही खाल्ल तरी अंगी लागत नाही, वजन वाढतच नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा किंवा अति बारिक असल्याचे अनेक दुष्परिणाम शरीरा वर दिसून येतात. त्यामुळे अनेक जण वजन वाढत नसल्याने ही चिंतेत असतात.

    काही लोक वजन वाढवण्यासाठी / तब्येत सुधारण्यासाठी नाना प्रकारचे घरगुती उपाय करत असतात. जसे की सप्लिमेंट घेणे परंतु  अशा प्रकारचे उपाय शरीराला हानीकारक ठरतात व त्याचे साइड इफेक्ट होण्याची ही शक्यता असते. याउलट काही घरगुती आयुर्वेदिक उपाय अशा समस्ये वर अत्यंत गुणकारी ठरतात.

असेच काही वजन वाढवण्यासाठी चांगले आणि गुणकारी उपाय आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत. वजन वाढवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत, जेणे करून वजन न वाढणे या समस्या मधून तुम्ही कायमचे मुक्त होऊ शकता.

वजन वाढवण्याचे उपाय / वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय / Vajan Vadhavnyasathi Upay (Weight Gain Measures)

सुरवातीला आपण वजन न वाढण्या मागची कारणे बघूयात. ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण काय दैनंदिन गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय करणे टाळले पाहिजे.

Ayushman Card Payment Check

तुमच्याकडे आयुष्मान कार्ड बनवलेले आहे? आणि तुम्हाला तुमच्या पैशाची माहिती मिळवायची आहे! तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, तुमच्या खात्यात पैसे येणार की हॉस्पिटलमधूनच मोफत उपचार मिळणार! या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी खलील बटन वर क्लिक करा.

वजन न वाढण्या मागची कारणे / तब्येत न सुधारण्या मागची कारणे

दैनंदिन जीवनात आपली दिनचर्या किंवा काही चुकीच्या सवयी पण आपले वजन न वाढण्यामागे प्रमुख कारण असू शकते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता असल्याने ही वजन वाढत नाही.

बध्दकोष्ठता गॅस व अपचन अशा समस्या असल्यास ही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर योग्य वेळी उपचार करणं गरजेचे आहे.

शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे ही शरीर कमजोर होते व वजन वाढत नाही. कोणत्या ही प्रकारची चिंता नैराश्य, कमी झोप यामुळे ही वजन वाढत नाही.

अनेकदा वजन न वाढण्यामागे आनुवंशकिता देखील कारण असू शकते.

या वजन न वाढण्याचा कारणांवर मात करायची असल्यास आपण नेहमी दिवसाची सुरूवात अगदी हलक्या व्यायामाने करा, योगा करा त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्ता मध्ये दुध आणि तूपाचा अधिक वापर करा. तुमच्या जेवणात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / जाड होण्यासाठी उपाय / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

खालील दिलेल्या घरगुती उपायांचा नियमित अवलंब केल्यास आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवण्याचे काही गुणकारी उपाय.

पूर्ण झोप – वजन वाढवण्यासाठी फायदेशीर

पुर्ण झोप
पुर्ण वेळ झोप ही अत्यंत गरजेची आहे

हल्लीच्या धावपळ व कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आपली झोप कमी होते व त्यांचे पडसाद आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज कमीत कमी ७ तासांची झोप ही तुमच्या शरीराला गरजेची आहे. चांगली झोप घेतल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास तुम्ही जे काही खाता त्याच्या तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पुरेशी झोप गरजेची आहे.

बटाटा – तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

बटाटा - वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
बटाटा – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटा मध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यां मध्ये फरक दिसायला सुरवात होईल.

केळे – वजन वाढवण्यासाठी उपाय

केळे
केळे – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो. केळ्यात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खाल्याने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.

खजूर – तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

खजूर आणि दूध  - जाड होण्यासाठी काय खावे
खजूर आणि दूध – जाड होण्यासाठी उपाय

खजूर खाल्ल्याने ही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात खजूर भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पिल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.

मनुका

मनुका - जाड होण्यासाठी घरगुती उपाय
मनुका – जाड होण्यासाठी उपाय

मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्या वर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीज मध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुका सोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.

नारळाचं तेल – तब्येत सुधारण्यासाठी फायदेशीर

नारळाचे तेल - वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय
नारळाचे तेल – तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

तुम्ही आता तुमच्या स्वयंपाका मध्ये मोहरी,सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तुम्ही जेवण हे मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईल मध्ये बनवण्या पेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळांच तेल हे दुबळेपणा दूर करून वजन वाढवण्यास गुणकारी आहे.दक्षिणे कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपल्या कडच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे ते आपल्याला नको वाटते परंतु नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.

काळे चणे

काळे चणे - जाड होण्यासाठी काय करावे / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय
काळे चणे

काळे चणे वजन वाढवण्यास फायदेशीर ठरतात. काळया चण्यांमध्ये प्रोटीन असतात जे की तुमच्या शरीरा साठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनुक्या प्रमाणेच रोज रात्री थोडे काळे चणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.

अश्वगंधा

वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दूधात साधारण पणे २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा नक्कीच वजन वाढण्यास फायदा होतो. दिवसां तून दोन वेळा याचे सेवन करावे. असे केल्यास साधारण २ महिन्यां मध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.

     वरील उपायांचा वापर करत असतांना आपण एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की, कमी किंवा जास्त खाल्याने आपले वजन कमी किंवा जास्त होत नाही. परंतु आपल्या शरीराला काही प्रथीने व सकस किंवा संतुलित आहार गरजेचा असतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरा वर होणारा परिणाम आपण समजला पाहिजे.

वजन वाढवण्यासाठी उपाय म्हणून काही खास उत्पादने / वजन वाढवण्यासाठी टॉनिक – वजन वाढवण्यासाठी औषधे

वजन वाढवण्यासाठी आपल्याला काही उत्पादने खाली सुचवण्यात आलेली यातील जे उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

NUTRIMUSCLE MASSIVE WEIGHT GAINER – CHOCO TREAT FLAVOUR – FOR WEIGHT GAIN – MADE IN INDIA

Advance MuscleMass Weight Gainer with Enzyme Blend 

Ayurwin Nutrigain Plus Powder – 500 Gm (Chocolate Flavour)

Winlip Health tone Herbal Weight Gain Capsules

वजन वाढवण्यासाठी / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय म्हणून काही खास टिप्स (Tips For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी तुम्ही वरील पैकी काही घरगुती उपाय तर कराच किंवा वजन वाढवण्यासाठी एखादे उत्पादन खरेदी कराल. परंतु त्याच बरोबर काही टिप्स देखील आचरणात आणा ज्या मुळे तुम्हाला तुमचे वजन वाढवण्याच्या या प्रयत्नांना नक्कीच गती मिळेल व रिजल्ट तुम्हाला लवकर मिळेल.

धूम्रपान टाळा

धूम्रपान - वजन न वाढण्याचे कारण
धूम्रपान – वजन न वाढण्याचे कारण

धूम्रपान हे तुमच्या शरीरा साठी घातक आहे हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही परंतु धूम्रपाणा मुळे तुम्ही केलेल्या तब्येत सुधारण्या च्या निर्णयाला खीळ बसू शकते. बर्‍याचदा आपण बघतो धूम्रपान करणार्‍या व्यक्ति पेक्षा धूम्रपान न करणार्‍या व्यक्तीचे वजन हे जास्त असते त्यामुळे धूम्रपाण शक्यतो टाळाच.

जेवणा आधी पाणी पिणे टाळा

पाणी फिल्टर किंमत
जेवणा आधी पाणी पिणे टाळा

जेवण करण्या आधी जास्त पाणी पिल्याने तुम्हाला जेवण जात नाही व त्यामुळे तुमच्या शरीराला हव्या असलेल्या कॅलरी मिळत नाहीत ज्या मुळे तुमचे वजन वाढत नाही. त्यामुळे शक्यतो जेवणा आधी आणि जेवत असताना मध्ये मध्ये जास्त पाणी पिणे टाळावे.

वजन वढी साठी उपयुक्त शेक प्या

मिल्क शेक - वजन वाढवण्यासाठी उपाय
मिल्क शेक प्या – वजन वाढवण्यासाठी उपाय

वजन वाढवण्यासाठी उपयुक्त शेक हे देखील वजन वाढवण्यासाठी योग्य पर्याय ठरतात. त्यामधे प्रोटीन व कॅलरी चे प्रमाण जास्त असते. ज्या मुळे तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होते.

जेवण घेताना शक्यतो मोठ्या ताटा मध्ये घ्या

जेवणासाठी मोठे ताट घ्या - वजन वाढवण्यासाठी उपाय
मोठ्या ताटा मध्येच जेवायला घ्या (Image credit: Total Shape)

अनेक जन एकदा ताटात वाढून घेतलेले अन्न च खातात व परत घेत नाहीत त्यांचा साठी हा सल्ला उपयोगी ठरू शकतो. जेवताना शक्यतो मोठ्या ताटात जेवण घ्या आणि मनसोक्त पणे भरपूर जेवण करा. जितके जास्त खाता येईल तितके जास्त खा आणि जेवल्या नंतर पूर्ण झोप घ्या असे नियमित पणे केल्यास आपले वजन नक्कीच वाढेल.

दुद्धजन्य पदार्थ आहारात कायम ठेवा

दुद्धजन्य पदार्थ - वजन वाढवण्यासाठी उपाय
दुद्धजन्य पदार्थ आहारात कायम ठेवा

दूध व दुधाचे पदार्थ हे तुमच्या आहारात कायम असले पाहिजेत. ज्या मुळे तुमच्या वजन वाढवण्याचा निर्णयाला मदत होईल. दुधाच्या पदार्थां मध्ये फँटस चे प्रमाण अधिक असते जे तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

नियमित व्यायाम करा

अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे
नियमित व्यायाम करा

तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही जीम लाच गेले पाहिजे असे काही नाही तुम्ही घरातल्या घरात देखील व्यायाम करू शकता. व्यायाम केल्याने भूक लागते व त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते त्यामुळे वजन वाढवण्या साठी / तब्येत सुधारण्या साठी नियमीत व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे.

सारांश – तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय / वजन वाढवण्यासाठी उपाय

वजन वाढवणे / तब्येत सुधारणे हे एक दिवसात मिळणारी गोष्ट नसून या साठी तुम्हाला सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला वरील पैकी उपाय सातत्य पूर्ण पद्धतीने आमलात आणणे गरजेचे आहे, असे केल्यास तुमचे वजन नक्कीच वाढेल. तुम्हाला सदृढ आणि निरोगी शरीरा साठी शुभेच्छा.

तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय काय करावेत ?

तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही खजूर, काळे चणे, बटाटा, केळी,मनुके,अश्वगंधा,मिल्क शेक,दुधाचे पदार्थ यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा त्याच बरोबर ज्या गोष्टी तुम्हाला टाळायचा आहेत त्या पुढील प्रमाणे :- धूम्रपान टाळा आणि जेवणा आधी शक्यतो पाणी पिऊ नका. अधिक विस्तृत माहिती साठी वरील लेख वाचा

वजन वाढवण्यासाठी काय काय खावे ? / जाड होण्यासाठी काय खावे

खजूर, काळे चणे, बटाटा, केळी,मनुके,अश्वगंधा,मिल्क शेक,दुधाचे पदार्थ हे शाकाहारी पदार्थ वजन वाढवण्यासाठी / जाड होण्यासाठी खावेत. त्याच बरोबर जर तुम्ही मांसाहार करत असाल तर उत्तमच आहे मांसाहार घेतल्याने देखील वजन वाढण्यास निच्छित मदत होते.

आपल्याला वजन वाढवण्यासाठी उपाय / तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

4 thoughts on “वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / जाड होण्यासाठी काय करावे, काय खावे”

  1. खरच सर आपण खूप छान‌ माहिती दिलेली आहे
    मनापासुन धन्यवाद

  2. वजन वाढविण्यासाठी ऊपाय उत्तम अशी माहिती आहे.मी डायबिटिज पेशंट आहे.आयुर्वेदीक उपचार सुरु आहेत.लेवल नॉर्मल आहे परंतू वजन फारच कमी झाले आहे अशक्त पणा खुप आहे.वजन वाढण्यासाठी काय उपाय आहेत कृपया सांगा.

Comments are closed.

Scroll to Top