सोन्याने गाठला नवा उच्चांक
महिला वर्गाच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्याचे दागिने.परंतु आता महिलां साठी एक दुखत वार्ता आहे ती म्हणजे सोने महागले आहे आणि ते पण थोडे थोडके नाही. सोन्याचा आजचा भाव 40 हजाराच्या पार गेला आहे. तर चांदीचे दरही वाढले आहेत. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीने आज नवा इतिहास रचला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोने एवढे महाग झाले आहे.
आज सोमवारी सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. ऑल इंडिया सराफ असोसिएशनच्या मते सोन्याच्या किंमतीत आज 675 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय राजधानीत ती 10 ग्रॅम 39,670 रुपयांवर पोचली आहे. असोसिएशनच्या मते रुपयाच्या घसरणीमुळे आणि जागतिक पातळीवरील मजबूत ट्रेन्डमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे 20 ऑगस्टपासून सोन्याच्या किंमती दररोज ताज्या उच्चांकाला भिडल्या आहेत.
दुसरीकडे, चांदीचा भाव सोमवारी 1,450 रुपयांनी वधारला, ज्यामुळे तो प्रतिकिलो 46,550 रुपयांवर आला. त्याचबरोबर, साप्ताहिक डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत 1,625 रुपयांनी वाढली आणि त्याची किंमत 45,291 रुपये प्रति किलो झाली. दुसरीकडे चांगली मागणी असल्यामुळे चांदीच्या नाण्यांमध्ये 3,००० रुपयांची वाढ झाली असून त्याची खरेदी किंमत प्रति शंभर 94,000 रुपये आणि विक्री किंमत प्रति शंभर 95,000 रुपये होती.
सोने दर वाढीची कारणे :
- चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे.
- डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची गेल्या काही महिन्यात झालेल्या घसरनी मुळे देखील सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
सोने चांदीचे दर
▪ दिल्ली – (22 कॅरेट) : 39,890 (10 ग्रॅम)
▪ मुंबई – (24 कॅरेट) : 40,040 (10 ग्रॅम)
▪ अहमदाबाद – (24 कॅरेट) : 40,000 (10 ग्रॅम)
▪ जयपूर – (24 कॅरेट) : 40,020 (10 ग्रॅम)
गेल्या वर्षी 2 ऑगस्ट 2018 रोजी 30 हजार 200 रुपयांवर असलेले सोने या वर्षी ऑगस्ट महिन्यात 40 हजाराच्या पुढे गेले आहे.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)