अर्ज कसा लिहावा मराठी / अर्ज लेखन कसे असायला हवे/ (arj kasa lihava marathi/marathi madhe arj kasa lihava/arj in marathi) >> आपल्याला कामाच्या ठिकाणी किंवा एखादे काम अडले असेल तर त्या ठिकाणी तसे तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही कामासाठी विनंती अर्ज हा करावाच लागतो. आपण एखाद्या कंपनी मध्ये कामाला असाल,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिक्षक असाल,बँकेत कर्मचारी असाल किंवा एखाद्या सरकारी सेवा देणार्या संस्थे मध्ये कामाला असाल. आणि आपल्याला जर सुट्टी हवी असेल तर आपण सुट्टी वर जाण्याच्या आधी वरिष्ठांना अर्ज करता. बर्याच ठिकाणी एक ते दोन दिवसांची सुट्टी घेण्यासाठी आपल्याला तश्या फॉरमॅट मध्ये तयार अर्ज कामाच्या ठिकाणी मिळतात, आणि त्या तयार अर्जावर तुम्ही तुमची माहिती भरून तो अर्ज साहेबांकडे देता आणि तुमची सुट्टी मंजूर करून घेता.
परंतु जर जास्त दिवसांसाठी सुट्टी हवी असेल तर तुम्हाला एका कागदावर हाताने एक अर्ज (application) लिहावा लागतो. त्याच बरोबर शासकीय कामे करण्यासाठी,एखादी माहिती मिळवण्यासाठी,ग्रामपंचायत मध्ये तक्रार देण्यासाठी किंवा बँकेत काही वेगळे काम करून घ्यायचे असेल तर तुम्हाला हाताने अर्ज लिहावा लागतो. अर्ज कसा लिहायचा / अर्ज लेखन कसे असायला हवे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात मराठी अर्ज कसा लिहावा.
अर्ज कसा लिहावा मराठी (marathi madhe arj kasa lihava)
अर्ज लिहण्याची सुरवात करताना,हे माहिती पाहिजे की एका अर्जाचे तीन भागात विभाजन होते, मग तो कोणताही असो कुठेही द्यायचा असो. हे तीन भाग पुढील प्रमाणे १ ) अर्ज कोणाला करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव,हुद्दा आणि अर्ज करत असलेल्या दिवसाची तारीख २) अर्जदाराचे नाव व अर्जाचा विषय ३) विस्तृत माहिती आणि ४) अर्जदाराचे नाव व सही. हेच ४ भाग आपण या लेखात क्रमाने बघणार आहोत.
अर्ज कसा लिहायचा(arj kasa lihaycha) – Step 1
अर्ज लेखन करायला सुरवात करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या व्यक्तिला अर्ज करायचा आहे त्याचे नाव व हुद्दा (पोस्ट) तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुमचे जे काम तुम्हाला अर्ज करून करायचे आहे ते काम ज्या व्यक्तीच्या अखत्यारीत येते त्याच्याच नावे तुम्ही अर्ज केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीच्या वरिष्ठ हुद्दया वर असणार्या व्यक्तिला तुम्ही अर्ज लिहू शकता.
जसे की जर तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून आहात आणि तुम्हाला सुट्टीचा अर्ज करायचा आहे तर तो तुम्ही प्रिन्सिपल च्या नावानेच केला पाहिजे. किंवा बँकेत एखादे काम करायचे आहे जसे की स्टेटमेंट काढायचे आहे तर तुम्ही जो अर्ज कराल तो अर्ज हा बँक मॅनेजर च्या नावे केला गेला पाहिजे. ग्रामपंचायत मधील अर्ज हा सरपंचाच्या नावे केला जातो.
अर्जाच्या सुरवातीला पानाच्या डाव्या बाजूला वरती तुम्हाला प्रति, लिहून खालच्या ओळीवर त्या व्यक्तीचे नाव टाकायचे आहे आणि त्या नंतर त्याच्या खालच्या ओळीवर त्या व्यक्तीचा म्हणजेच ज्याला तुम्ही अर्ज करत आहात त्यांचा हुद्दा टाकावा. आणि उजव्या कोपर्यात आपण अर्ज ज्या दिवशी हा अर्ज लिहीत आहात त्या दिवशीची तारीख टाकावी.
उदाहरणार्थ:-
मराठी अर्ज कसा लिहावा (arja lekhan in marathi) – Step 2
मराठी अर्ज लिहताना या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे म्हणजेच अर्जदाराचे नाव व अर्ज का करत आहात,या अर्जाचे मुख्य कारण म्हणजेच विषय काय आहे हे लिहायचे आहे. तुम्ही जर बँकेत तुमच्या अकाऊंट ची सही बदलण्यासाठी अर्ज करत असाल तर ते तुम्ही या स्टेप मध्ये “विषय – सही बदलण्याबाबत” असे थोडक्यात टाकायचे आहे. जर समजा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज करत असाल तुमच्या नळाला पाणी येत नाही म्हणून तर तुम्हाला थोडक्यात तसे लिहावे लागेल.
विषय लिहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे आपल्याला आपला पूर्ण विषय विस्तृत लिहायचा नाहीये,या ठिकाणी फक्त विषयाचे नाव लिहणे अपेक्षित आहे.
उदाहरणार्थ: –
अर्ज कसा लिहावा मराठी (arj in marathi) – Step 3
या स्टेप मध्ये आपल्याला अर्ज कोणत्या कारणासाठी करत आहोत ते विस्तृत स्वरुपात लिहायचे आहे. जर तुम्ही सुट्टी साठी अर्ज करत असाल आणि तसा विषय लिहला असेल तर सुट्टी कोणत्या कारणासाठी पाहिजे आहे त्याचे विस्तृत विवरण या या ठिकाणी करायचे आहे. किंवा जर तुम्ही एखादा तक्रार अर्ज करत असाल तर तक्रार कशा संधर्भात आहे ते सांगायचे आहे.
तुम्ही जर बँकेत अर्ज करत असाल तर या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे सर्व डीटेल लिहायचे आहेत जसे की तुमचा अकाऊंट नंबर, अकाऊंट कधी पासून आहे,आणि मग काम काय आहे त्या संधर्भात विस्तृत माहिती लिहायची आहे.
उदाहरणार्थ:-
अर्ज लेखन (arja lekhan in marathi) – Step 4
या स्टेप मध्ये अर्जाच्या शेवटी तुम्हाला तुमचे नाव टाकून सही करायची आहे. नाव व सही ही पानाच्या उजव्या कोपर्यात खाली असावी आणि तुमचे नाव हे तुम्ही पूर्ण टाकून तिथे सही करून तुम्ही हा अर्ज केला आहे याची हमी देता. खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे सही लिहलेल्या ठिकाणी तुम्ही तुमची सही करावी.
उदाहरणार्थ:-
अर्ज लेखन कसे असायला हवे – फॉरमॅट (marathi arj format)
वरील दिलेल्या 4 स्टेप क्रमाने वापरुन तुम्ही कोणताही अर्ज अगदी सहज लिहू शकता,त्यासाठी तुम्हाला कोणाला “अर्ज कसा लिहावा” असे विचाराची गरज नाही पडणार. वरील चारही स्टेप वापरुन तयार अर्ज फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “Marathi arj format” या बटन वर क्लिक करा.
आपल्याला अर्ज कसा लिहावा ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Si mazi tc haravli aahe tar mala police station la FIR karaychi aahe arj kasa lihu plz email kara
This is a very helpful blog post. I have been trying to learn Hindi and this will be very helpful.