नाताळ ची माहिती / ख्रिसमस ची माहिती >> संपूर्ण जगात सर्वात मोठ्या लोकसंख्ये मध्ये साजरा होणारा सण म्हणजे ख्रिसमस, त्यालाच भारतीय उपखंडात नाताळ या नावाने ओळखले जाते. आज आपण याच सणा बद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामद्धे नाताळ सणाची माहिती / ख्रिसमस ची माहिती तुम्हाला वाचायला मिळेल, जसे की नाताळ चा इतिहास, नाताळ साजरा कसा करतात, खिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या विषयीची माहिती आणि बरेच काही.
नाताळ ची माहिती / ख्रिसमस ची संपूर्ण माहिती (Khrismas / Natal chi mahiti marathi)
नाताळ सणाचा इतिहास (नाताळ ची माहिती)
१) चार्ली मेगन राजाचा राज्याभिषेक २५ डिसेंबर ८०० ला झाला. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात आला आणि ह्या दिवसाला अजून महत्त्व प्राप्त झाले.
२) मध्ययुगात नाताळ हा एक सार्वजनिक उत्सव बनला. नाताळ ख्रिस्त धर्मियांचा महत्त्वपूर्ण सण असला तरी ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेनंतर बरीच वर्ष हा सण साजरा करण्याची प्रथा नव्हती.
३) येशू ख्रिस्तानी मानव मुक्तीसाठी मृत्यू स्वीकारला आणि त्यांचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत असे.
४) ईस्टर चा सण अगदी सुरुवाती पासून साजरा केला जात होता.
५) रविवार चा दिवस प्रभूचा दिवस साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जात असे.
६) प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी येशूच्या जन्माचा सण साजरा करण्याची कल्पना पुढे आली चौथ्या शतकानंतर साऱ्या ख्रिश्चन समाजात हा सण साजरा होऊ लागला इसवीसन ५३४ मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला.
येशू ख्रिस्त धर्माचे संस्थापक
येशू हे ख्रिस्त धर्माचे संस्थापक मानले जातात. बायबल ग्रंथ हा ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ आहे, त्यात येशू ख्रिस्तच्या जन्मा संबंधी त्यांचे जीवन कार्य ,शिकवण या विषयासंबंधी माहिती दिली गेली आहे. येशू यांना मरियम पुत्र नासरेथ, गावाचा येशू ,प्रभू येशू, ख्रिस्त ,जीजस ख्रिस्त, येशू किंवा ईसा मसीह असे ही म्हटले जाते. प्रभू येशूचा पुनर्जन्म २५ डिसेंबर ला उत्साहात साजरा केला जातो.
येशू ख्रिस्त यांचा जन्म
नाताळ चा अर्थ ख्रिस्ती येशू चा जन्म दिवस साजरा करणे ,ह्या दिवशी येशू चा जन्म झाला असे मानले जाते ( प्रभू येशू ला देवाचा पुत्र मानले जाते ).
१) मानव मुक्तीसाठी येशूने मृत्यू स्वीकारला आणि त्यांचे पुनरुज्जीवन झाले, या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत नसे ईस्टर चा सण अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता.
२) रविवार हा दिवस प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक म्हणून साजरा केला जात असे.
३) नाताळ म्हणजे येशूच्या जन्माचा सण म्हणून साजरा केला जात नव्हता.
४) येशूच्या मृत्यू नंतर १०० वर्षांनी येशू जन्माच्या सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
५) काही देशात नोव्हेंबर मध्ये तर काही देशात डिसेंबर तर कुठे जानेवारीत तर कुठे एप्रिलमध्ये, त्याकाळी जन्मतारीख नोंदवण्याची प्रथा नव्हती आणि यहुदी लोकात जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती.
६) इसवी सन ३४५ वर्षी त्यावेळचे पहिले पोप liberiyas यांनी २५ डिसेंबर हा दिवस येशूच्या जन्माच्या दिवसाच्या रूपात साजरा करावा असा निर्णय घेतला.
७) येशू स्वतः म्हणाले होते की मी जगाचा प्रकाश आहे.
८) म्हणून मग ख्रिस्ती बांधवांनी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म हा दिवस नाताळ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
९) असे मानले जाते की हा दिवस येशूचा मृत्यू आणि पुनर्जीवित होण्याचा मानला जातो.
१०) काही ख्रिस्ती बांधव नाताळ चा सण पूर्व संध्येलाच साजरा करतात येशूची जन्माची सुवार्ता सांगणारे मॅथ्यू आणि लूक यांच्या कथा आणि प्राचीन क्रिश्चन लेखकांच्या सांगितलेल्या तारखांमध्ये अंतर किंवा तफावत दिसून येते .
येशू च्या जन्माचे महत्व
ख्रिस्ती धर्माच्या प्रसिद्ध असलेल्या बायबल या ग्रंथामध्ये मॅथ्यू आणि ल्युक द्वारे येशू च्या जन्म दिवसाची कहाणी सांगितली आहे.त्यानुसार प्रभू येशू च्या जन्मशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी खाली देत आहोत.
१) त्यांच्या नुसार येशूचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावातील एका गोठ्यात झाला.
२) संत ल्युक कथनानुसार येशूची आई मारिया आणि वडील जोसेफ यांना देवतांनी मरियम लां येशू तिच्या पोटी येण्याचे सांगितले.
३) तसेच संत मॅथ्यू यांच्यानुसार तीन राजे येशु ला भेटायला आले , आणि येशूला भेटवस्तू दिल्या येशूच्या जन्माची वार्ता कळताच त्यावेळच्या राजा हेरौड ने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिल्यामुळे येशूचे कुटुंबातील लोक जिव वाचवण्यासाठी इजिप्त ला गेले.
४) प्रतीकात्मक कारणामुळे येशूने आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला असे म्हणतात पण लोक या दिवसाला बडा दिन किंवा क्रिसमस म्हणून साजरा करतात.
५) हा दिवस लहान होता पण ह्या दिवसानंतर दिवस मोठा होत जातो व आपल्यासाठी उन्नतीचा मार्ग प्रशस्त केला असे क्रिश्चन अनुयायांना वाटते.
६) चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हटल्या जातात आणि काही ठिकाणी नाताळ सणा पूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात त्याला कॅरोल म्हणतात.
नाताळ साजरा करण्याच्या पद्धती – नाताळ ची माहिती
१) ज्याप्रमाणे इतर सर्व धर्माचे लोक आपला सण साजरा करतात. त्याचप्रमाणे ख्रिश्चन बांधव आपल्या ख्रिश्चन अनुयायांना भेटवस्तू , शुभेच्छापत्रे देऊन एकमेकांना अभिनंदन करतात व घरांना सुंदर रोषणाई करून घर सजवले जाते.
२) ख्रिसमस ट्री ( वृक्षाची ) सजावट सर्वात महत्त्वपूर्ण असते.
३) या दिवशी सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू आणतो ,ह्यामध्ये चॉकलेट केक आणि वेगवेगळे पदार्थ आणि वस्तू असतात.
सारांश – नाताळ ची माहिती / ख्रिसमस ची माहिती
नाताळ सणाच्या पाठोपाठच नविन वर्ष येत असल्या मुळे हा सण सर्वच धर्मातील लोकांसाठी नव चैतन्य देणारा सण असतो व या नाताळची माहिती आपल्याला या लेखाच्या माध्यमातून देण्याचा हा आमचा प्रयत्न. या सणाच्या निमित्ताने प्र्येक जण आपआपल्या परीने खरेदी करत असतो. आपण देखील नाताळ सणाच्या निमित्ताने व नविन वर्षाच्या सुरवातीला गोर गरीबाकडून साहित्य खरेदी करुन त्यांना ही नाताळ सण आनंदाने साजरा करण्यासाठी व आनंद देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करु शकतो.
आपल्याला ही नाताळ ची माहिती / ख्रिसमस ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्या कडे अधिक काही माहिती असल्यास अवश्य कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)