बाळाचा आहार कसा असावा | वयाच्या महिन्याच्या नुसार बाळाचा आहार कसा असावा >> बाळाचा आहारा संबंधी बर्याच मातांना चिंता असते. बाळाच्या आईला नियमित पडणारा प्रश्न म्हणजे त्यांच्या बाळाचे पोट पूर्णपणे भरते आहे का ? आणी दुसरी अडचण म्हणजे बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवस त्याला आईच्या दुधाशिवाय इतर आहार देता येत नाही. कारण बाळाची पचन क्रिया पूर्णपणे सुधारलेली नसते. त्यांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते म्हणून त्याला लगेच अॅलर्जी होते किंवा तो बाहेरील आहार बाळाला पचत नाही व या कारणामुळे देखील लहान मुले रडतात. त्यामुळे बाळाला काही दिवस स्तनपान देत असतात आणी स्तनपानातून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात.
अनेक नवीन आई झालेल्या स्री च्या या बाळाच्या आहारा विषयी असणार्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न या लेखामध्ये आम्ही केला आहे.
बाळाचा आहार कसा असावा | बाळाच्या वयाच्या महिन्यां नुसार बाळाच्या आहारातील बदल कोणते कोणते आहेत ? (Balacha Ahar Kasa Asava)
तेंव्हा आपण बाळाच्या आहाराविषयी बाळाच्या वयाच्या महिन्यांनुसार काही टप्पे जाणून घेणार आहोत. व बाळाचा आहार कसा असावा तसेच त्याच्या आहारात काही बदल करताना कोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत त्या विषयीची संपूर्ण माहिती खाली विस्तृत स्वरुपात दिलेली आहे.
सुरवातीचे सहा महिने बाळाचा आहार कसा असावा (6 महिन्याच्या बाळाचा आहार)
साधारणतः पहिले सहा महिने बाळाला स्तनपानचं द्यावे असे सांगणयात येते. कारण या काळात बाळाची पचन यंत्रणा इतर अन्न पचवण्या इतकी सक्षम झालेली नसते आणि ही यंत्रणा सक्षम होण्यास साधारण सहा महिने लागतात. त्या बरोबर बाळाला बाळगुटी देखील तुम्ही देऊ शकता. मात्र सहा महिन्यानंतर बाळाच्या वेगवान वाढीसाठी आईचे दूध पुर पडत नाही, त्या मध्ये लोह आणी कॅल्शियमची कमतरता भासू लागते .त्यामुळे साधारणत सहा महिन्यानंतर बाळाचा वरचा आहार सुरु करण्यास हरकत नसते पण या आधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
कधी कधी काही बाळांना ६ महिन्याच्या आतच आईचे दुध पुरेनासा होते.अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांना वरचा आहार सुरु करावा. यामध्ये गुळगुळीत आणि गिळायला सोपा जाईल अशा पदार्थांचा समावेश असला पाहिजे .
सहा महिने ते आठ महिने (सुरवातीच्या सहा महिन्यानंतर खालील प्रमाणे आहार देण्यास सुरुवात करावी) (8 महिन्याच्या बाळाचा आहार)
१) तांदुळ किंवा ओटमीलचं तयार सीरीयल आईच्या दुधात ,फॉर्म्युला मिल्कमध्ये उकळून गार केलेल्या पाण्यात कालवावं आणी आगदी मऊसर गुळगुळीत करुण बाळाला भरवावे.
२) घरच्या घरी तांदुळ आणि मुगाच्या डाळीचा रवा काढून तो मऊ शिजवूनही अशी पेज बाळाला देता येईल.
३) अधून मधून वरणाचे पाणी त्यात थोडंस मीठ घालून सूप म्हणून द्यावा किंवा फळाचा रस दयावा. फळांचा रस देतांना बिया त्यात नसतील याची काळजी घ्यावी.
८ महिन्यांच्या पुढे व ११ महिन्या पर्यंत वय असलेल्या बाळाचा आहार कसा असावा (9 महिन्याच्या बाळाचा आहार)
बाळ साधारण ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर त्याच्या हालचाली त्याच्या आई वडिलांसाठी सुखद धक्का देणार्या असू शकतात. कारण या काळातच बाळ स्वतःच इवलसं शरीर उचलून तुमच्या हातातला चमावा हिसकावू पाहते तेव्हा तुम्ही समाजायचे की त्याला आता नवीन आहार सुरू करायची हिच योग्य वेळ आहे. आता त्याला दिवसातून तीन वेळा तरी पूरक आहार दिला पाहिजे . त्यात एक तृणधान्य, एक भाजी आणि एक फळ यांचा समावेश करावा.
बाळाला नाष्टा म्हणून स्तनपान दिले तरी चालेल. नाष्टा झाल्यावर काही वेळाने पण जेवण्याआधी बाळाला गाजर शिजवून कुस्करून घ्यावे.
१) जेवणामध्ये साधारण पणे मऊसर बाळाला गिळता येईल अशी मुगाच्या डाळीची खिचडी असावी.
२) रात्री एकदा पुन्हा शिजवलेले गाजर अथवा उकडलेला बटाटा द्यावा.
३) झोपताना पुन्हा एकदा स्तनपान देवून बाळाला झोपावावे.
४) मऊ शिजणाऱ्या भाज्या आणि फळे यांचा शिजवून लगदा करून आहार म्हणून द्यावा.
५) सुरुवातीला पालक भोपळा कोहळा रताळ गाजर आशा भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून मऊ वाफवू द्यावेत. हे शिजवताना त्यात पाणी मात्र घालू नये.
६) फळांमध्ये सफरचंद, पेरू, चिकू, केळी हे सुद्धा साल बिया काढुन वाफवून द्यावे. आणि लक्षात असुदया एकावेळी एकच भाजी किंवा फळ दयायचं आहे.
८ ते ११ महिन्यांच्या मुलाचे असे साधारण आहाराचे वेळापत्रक असावे. बाळाच्या क्षमतेनुसार बाळाला कमी जास्त आहार करावा. म्हणजे बाळाला संध्याकाळी खिचडी किंवा उकडलेला बटाटा दिला आणी बाळाचे पोट भरले असले तर स्तनपान देऊ नये. खिचडीच्या ऐवजी मऊसर भात तिखट नसलेली आमटी किंवा गव्हाच्या आोटसची मऊसर लापशी दयावी .
१ वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा
एक वर्षाच्या बाळाला तुम्ही घरात शिजवता किंवा तुम्ही जे खाता ते खाता आलं पाहिजे पदार्थांना चव आणण्यासाठी हिंग, सुंठ, जिरेपूड, धणेपुड किंवा दालचिनीचा वापर करावा. या वयाची मुले थोड वेगळ आणी थोडंसं जड अन्न खाऊ शकतात आणि त्यांना खाऊ घालणे सोपे जाते. तसेच विविध खाण्याबाबत कुरबुरी देखील चालू होतात. त्याला हा आहारातला बदल आवडू लागतो. आणि खाताना ते जास्त त्रासही देत नाही.
जर तुम्ही तुमच्या बाळाला वरील प्रमाणे ११ महिन्यांचे आहार नियोजन करून आहार दिला आहे तर त्यावरुन त्याला काय खाऊ घालावे आणि काय नाही हे पालकाच्या लक्ष्यात येईल. स्तनपानाविषयी बोलायचं झाले तर १ वर्ष पूर्ण होत आले म्हणून बाळाचे स्तनपान बंद करु नये. कमीत कमी आणखी ६ महिने म्हणजे बाळ साधारण १२ ते १८ महिन्यांचे होईपर्यंत त्याच्या आहारात स्ननपान महत्त्वाचे असते.
बाळाला आहार देताना कोणते पदार्थ देणे टाळावे / कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
१) बाळानं घास गिळलाय ही खात्री झाल्याखेरीस पुढचा घास भरुवू नये.
२) बाळ लहान असताना त्याला चमचा मधला पदार्थ ओढून घेता येत नाही हे लक्षात घेऊन चमच्याच्या टोकावर छोटासा घास घेवून त्याला भरवावा.
३) सुरुवातीच्या काही दिवसांत एक पदार्थ रोज फक्त एकदाच भरवावा.
४) एखादा नवीन पदार्थ भरवताना बाळाची काही तक्रार वाटली नाही तर तो पदार्थ बाळाच्या आहारात समाविष्ट करावा.
५) नवीन पदार्थ दिल्यावर बाळाची प्रतिक्रिया महत्त्वाची असते. त्यानुसार बाळाला काय पचते काय चालते हे जाणून घ्यावे.
टीप :- बाळ साधारण १ वर्षांचे होईपर्यंत काही पदार्थ त्याला देऊ नयेत ते म्हणजे अंड्याचा पांढरा भाग, मीठ, साखर, तळलेले पदार्थ, मध, शेंगदाणे, काजू, पिस्ता, गायीचे दूध, चहा व कॉफी हे सगळे पदार्थ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
I’m gone to inform my little brother, that he should also visit this webpage on regular basis to take updated from
most recent gossip.
This paragraph provides clear idea in favor of the
new people of blogging, that in fact how to do blogging.
Hi Nice site
Awesome! Its genuinely remarkable paragraph, I have got much clear idea on the topic of from this paragraph.
I have been reading out a few of your stories and i can claim pretty nice stuff. I will make sure to bookmark your website.
I really enjoy the blog post. Really looking forward to read more. Cool. Justin Riveras
Thanks you for this blog this blog is very useful for me. I Have subscribe your blog for future post because i have interest of read your blogs. Lou Baskerville