बारकोड >>
भारताची आर्थिक परिस्तिथी व पंतप्रधानांचे आत्मनिर्भर तेचे आव्हान
आपल्या देशाचा GDP विकास दर जो वर्ष 2020-21 मध्ये जवळ पास 6% होता तो कमी होऊन आता 0.8% वर आलेला आहे.विदेशी मुद्रा साठा संपत चालला आहे.डॉलर च्या तुलनेत रुपया ची किंमत कमी होत चाललेली आहे.२५मार्च पासून आपला देश lockdown करण्यात आलेला आहे.भारताची अर्थव्यवस्थेचे जवळ पास 18 लाख करोड एवढे नुकसान होऊ शकते.आताची परिस्तिथी हो दुसऱ्या जागतिक महायुद्धा पेक्षा भयानक होत आहे.
पण अश्या परिस्तिथीत देखील आपण सर्व आपल्या देश्याला वाचवू शकतो आपल्या देश्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर आपल्याला एक मोहीम हाती घ्यावी लागेल ती म्हणजे आपण जे काही विकत घेऊ,ते भारतीय असले पाहिजे,ते भारतीय कंपनी ने बनवलेले असले पाहिजे.त्यामुळे जर या आर्थिक संकटातून देश्याला बाहेर काढायचे असेल तर इथून पुढच्या काळात तुम्ही जे काही विकत घ्याल ते भारतीय असायला हवे.
यासंधर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देश्यातील नागरिकांना जास्तीत जास्त भारतीय उत्पादने आणि स्थानिक पातळीवर उत्पादित उत्पादने वापरण्यास सांगितले.
बारकोड संधर्भात सोशल मीडिया वरील पोस्ट
पंतप्रधानांच्या भाषणा नंतर, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर बर्याच लोकांनी आत्मनिर्भर बनण्या संधर्भात पोस्ट केल्या आहेत. जे इतर देशांकडून येणारी कोणतीही उत्पादने वापरू नका असे आवाहन करत आहेत. या आव्हाना बरोबरच अश्या पोस्ट देखील होत्या ज्यामध्ये दावा केला गेला की वस्तुच्या मागील बारकोड पाहून, हे निर्धारित केले जाऊ शकते की ती वस्तु भारतात बनविलेले आहे की अन्य कोठे.
त्या पोस्ट्स मध्ये असा दावा केला गेलेला आहे की वस्तूच्या बारकोड वर दिलेल्या नंबर ची सुरवात जर 890 ने झाली असेल तर ती वस्तु भारतात बनवलेली असते किंवा भारतीय असते आणि जर नंबर ची सुरवात 690 ते 699 पैकी कोणत्याही नंबर ने झालेली असेल तर ती चीन ची वस्तु आहे.
बारकोड च्या त्या वायरल पोस्टची सत्यता तपासणी
परंतु ज्या वेळी आम्ही ह्या गोष्टीची पडताळणी केली त्यावेळी आमच्या हाती आलेल्या माहिती नुसार वस्तूच्या बारकोड वरून वस्तू कोणत्या देश्यात बनवली आहे ही माहिती मिळते हा दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही वस्तु वरील बारकोड चे पहिले काही अंक हे बारकोड क्रमांकाचा मूळ देश दर्शवतात. बारकोड क्रमांक उत्पादन/वस्तु किंवा कंपनीच्या मूळ देशाबद्दल काहीही माहिती सांगत नाही.
Barcode 1 या वेबसाइट वरील या संधर्भातील माहिती
त्यामुळे इथून पुढच्या काळात जेंव्हा पण तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल त्यावरील बारकोड च्या अंकावरून तुम्ही तिला भारतीय आहे का नाही हे ठरवू शकत नाही आणि जर चुकून असे कराल तर तुम्ही आपल्याच देश्याचे नुकसान कराल हे लक्षात असू द्या.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)