जहां कश्तियां जिद्द पे होती हैं। वहां तूफान भी हार जाते हैं ।

waterdensor diya premium

पवार कोविड विरोधात मैदानात >> सतत लढत राहायचे मग परिस्तिथी कोणतीही असो,आपल्या सोयीची असो किंवा नसो,वय काहीही असो जिद्द सोडता कामा नये ही वाक्ये एखादे पुस्तक किंवा एखाद्या सिनेमा मध्ये तुम्ही ऐकली असतील,पण त्याचे जिते जागते उदाहरण आहेत शरदचंद्रजी पवार साहेब.

वय वर्ष 80 तरी देखील हे मानव रुपी वादळ काय थांबायचे नाव घेत नाहीये, ६ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य व देशाच्या राजकीय इतिहासातील आता पर्यंतची सर्वात उत्कंठा वर्धक निवडणूक झाली,त्यात विरोधकांना चारही मुंड्या चित करून हा योद्धा पुढे निघाला.

महाराष्ट्र राज्याची घडी नीट बसवोस्तवरच नियतीने पुन्हा एकदा कोरोनाच्या रुपात ह्या योध्याची आणि पर्यायाने ह्या योध्याच्या पाठीमागे असलेल्या जनतेची परिक्षा बघायचे ठरवले होते.

त्यात शत्रु देखील कुरघोड्या करतच होता,शत्रूला याची देखील जाणीव राहिलेली नव्हती की आलेले हे संकट पूर्ण मानव जातीवर आलेले आहे अश्या कित्येक सत्ता येतील आणि जातील पण आपली जनता जगली पाहिजे.असो…

आता शत्रूच्या सर्व कुरघोड्यांना आपल्या कौशल्याने दिमाखात उत्तर देऊन,हा योद्धा कोरोना सोबत दोन हात करायला निघाला आहे.

संकटे आणि शरद पवार

waterdensor diya premium

तसे संकटांशी खेळण्याची पवारांना जणू सवयच झाली आहे, किंबगुना संकटांना ते म्हणत असावेत

” चाहे कितनी बार तुमने मुझे गिरानेकीं कोशीश की हो,

फ़िर भी मुकम्मल खडा हूँ,

ऐ मुश्किलो ! देखो मैं तुमसे कितना बडा हूँ। ”

आज पर्यन्त त्यांनी संकटाच्या काळात देखील राज्य/राष्ट्र कसे चालवायचे याचे धडे आपल्या सहकार्यांना तर दिलेच (ते आपण गेल्या २ महिन्यां पासून पाहतच आहोत.)

पण कित्तेक वेळा विरोधकाला देखील त्यांच्या मार्गदर्शनाची गरज भासते याचे ताजे उदाहरण म्हणजे अगदी काल परवा विडिओ कॉल मार्फत पंतप्रधानांनी शरद पवारांशी केलेली सल्ला मसलत.

आता काल परवा पर्यंत पवारांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्रा सह देशातील जनतेला संबोधित केले.

परंतु हे संकट अजून म्हणावे तेवढे कमी होताना दिसत नाही म्हंटल्यावर वर हा “८० वर्ष्या चा तरुण” स्वतः बाहेर पडला आहे.

पवार कोविड विरोधात मैदानात

आज त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबई येथील BKC आयसोलेशन सेंटर आणि वरळी येथील NSCI Dome या दोन्ही कोविड केअर सेंटरला भेट दिली व तिथल्या परिस्तिथीचा आढावा घेतला.

तसा पवारांना संकटातून बाहेर काढायचा दांडगा अनुभव,मग ते किल्लारी चा भूकंप असो,मुंबई तील बॉम्बस्फोट असोत,किंवा मग शेतकरी संकटात असो.

पवार किल्लारी भूकंप च्या वेळी (पवार कोविड विरोधात मैदानात)
शरद पवार किल्लारी भूकंप च्या वेळी जनते सोबत संवाद साधताना (Photo Courtesy: Sharad Pawar)

आता आपल्या त्याच करिश्मा चा आणि अनुभवाचा उपयोग करून ह्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करायला ते स्वतः पवार कोविड विरोधात मैदानात उतरले आहेत.

पवार कोविड विरोधात मैदानात
पवार कोविड विरोधात मैदानात

आताच्या अश्या कोरोना महामारीच्या समयी या वय वर्ष ८० असलेल्या माणसाला रस्त्यावर उतरण्याची,परिस्तिथीची पाहणी करण्याची वास्तविक तशी काही गरज नाही.

पण समाजा प्रती सतत काम करण्याची धडपड ह्यांना काय निवांत बसू देत नाही. ही जनता हीच माझी ऊर्जा आहे असे साहेब नेहमी म्हणतात. हेच त्यांचे मोठे पण.

आता खुद्द पवार कोविड विरोधात मैदानात उतरलेत म्हंटल्यावर ते मार्ग काढल्या शिवाय थांबणार नाहीत हे नक्की.

शरद पवारांच्या या जिद्दी ला अनुसरून एक शेर

” ये मंजिलें बड़ी जिद्दी होती हैं, हासिल कहां नसीब से होती हैं।
मगर वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद्द पे होती हैं।।”

आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला कमेन्ट करून जरूर कळवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top